जिल्ह्याला पावसाने झोडपले; दुष्काळी भागात ओढ्यांना पाणी; पिके भुईसपाट तर घरावरील पत्र्यांची भिंगरी

Satara News 20240609 072409 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाला असून शनिवारी साताऱ्यासह पश्चिम भागात अनेक ठिकाणी धुवाॅंधार पाऊस कोसळला. तर पूर्व दुष्काळी भागातही पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे बळीराजांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले. शनिवारी झालेल्या पावसाने जिल्ह्यात कोरेगाव, कराड तालुक्यात देखील पिकांचे व दुकानांचे नुकसान झाले. कोरेगाव तर दुकानावरील पत्रे भिंग्रीसारखे उडून गेले. तर वादळी … Read more

सातारा जिल्ह्यातील ‘या’ कारखान्याकडून ऊस तोडणी वाहतूक करार

Satara News 41

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील किसन वीर कारखान्याकडून आगामी सन २०२४-२५ या गळीत हंगामासाठी ऊसतोडणी वाहतुकीच्या करारास सुरुवात करण्यात आली. सातारा सहकारी शेती औद्योगिक तोडणी व वाहतूक सोसायटीमार्फत कारखाना कार्यस्थळावर प्राथमिक स्वरुपात नितीन कणसे, नारायण कणसे, धनाजी जाधव, ओंकार मोरे, दीपक जाधवराव, हणमंत आसबे, अविनाश सावंत, किरण सावंत, सुरेश घाटे, आदिनाथ सावंत, मनोहर कोकरे या … Read more

रात्रीत लांडग्याच्या टोळीचा 15 शेळ्या मेंढरांवर हल्ला; ‘या’ गावात घडली घटना

Satara News 40

सातारा प्रतिनिधी । लांडग्याच्या टोळीने एकत्रितपणे सुमारे १५ शेळ्या मेंढरांवर हल्ला केल्याची घटना म्हसवड येथील शिंदे वस्ती येथे शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात सुमारे १५ शेळ्या आणि मेंढरांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, घटनास्थळाचा अधिकाऱ्यांकडून पंचनामा करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, म्हसवड येथील विरकरवाडी नजिक शिंदे वस्ती आहे.या वस्तीवर धनाजी शिंदे यांनी … Read more

कोयना, नवजासह महाबळेश्वरला पावसाची हजेरी; पुढील 3 दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार कोसळणार पाऊस

Satara News 38

सातारा प्रतिनिधी । गेल्या काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने मान्सूनच्या आगमनापूर्वी शेतकऱ्यांकडून खरीप हंगामाची पूर्व तयारी केली जात आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसापासून मान्सून सातारा जिल्ह्यात दाखल झाला असून गुरूवारी रात्रीपासून पश्चिम भागात चांगला पाऊस पडला. कोयना, नवजासह महाबळेश्वरलाही हजेरी लावली. तसेच पूर्व भागातही अनेक ठिकाणी पाऊस पडला. तर हवामान विभागाने पुढील तीन दिवस … Read more

सातारा झेडपीच्या सभेत खरीप हंगामात अनुदानावर बियाणेसाठी ‘इतक्या’ लाख रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता

Satara News 20240607 221429 0000

सातारा प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्याने आज जिल्हा परिषदेची ठराव समितीची सभा मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये खरीप हंगामात अनुदानावर बियाणेसाठी जिल्हा परिषदेच्या ठराव समितीत ३० लाख रुपये खर्चास प्रशासकीय मान्यताही देण्यात आली. सातारा जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्यावतीने यावर्षीही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात अनुदानावर बियाणे मिळणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना … Read more

पावसाळ्यात जनावरांना आजारापासून रोखण्यासाठी करा लसीकरण; पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण सुरू

Satara News 32

कराड प्रतिनिधी । पावसाळा सुरुवात झाली की साथरोगांमध्ये वाढ होते. पावसाळ्यात माणसांप्रमाणचे जनावरांनाही अनेक आजार होत असतात. त्यामुळे पशुपालकांना काळजी घ्यावी लागते. तसेच पशुसंवर्धन विभागाच्या वतीनेही पशुधनाची काळजी घेण्यात येते. यासाठी जनावरांना लसीकरण करण्यात येते. सध्या जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरणाची मोहीम सुरू असून पावसाळ्याच्या काळात पशुधनासाठी हे लसीकरण महत्त्वाचे ठरणार आहे. पावसाळ्यात घटसर्प, फच्या यांसारख्या … Read more

जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी; ‘या’ 2 योजनांच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

Satara News 26

सातारा प्रतिनिधी । नियंत्रित वातावरणातील शेती, सुक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर तसेच अनेक फळपिके आणि भाजीपाला पिकांची लागवड करणाऱ्या सर्वसाधारण प्रवर्ग, अनु. जाती व अनु. जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासन कृषी विभागामार्फत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजना राबविली जात आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करून योजनेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन … Read more

जिल्ह्यातील सहा प्रमुख धरणात आहे ‘इतका’ पाणीसाठा शिल्लक

Satara News 23

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा प्रमुख धरणांत अल्प पाणीसाठा शिल्लक असून, पाणी टंचाईचे संकट गडद होत चालले आहेत. धोम, उरमोडी, बलकवडी, तारळी धरणात गतवर्षीच्या तुलनेत खूपच कमी पाणी शिल्लक आहे. मॉन्सूनने वेळेवर हजेरी लावली नाही, तर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना भीषण टंचाईला सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे. सध्या जिल्ह्यात … Read more

ऊस लागणीसाठी धांदल; यंदा 86032 या प्रजातीच्या वाणाला पसंती

Agriculture News 20240605 090009 0000

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकून घेतली आहेत. सध्या तालुक्यात अनेक ठिकाणी ऊस लागणीसाठी लगबग सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्यातील बहुतांश शेतकरी ८६०३२ या प्रजातीच्या उसाच्या वाणाला जास्तीत जास्त पसंती देत असल्याचे दिसून आले आहे. गतवर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने नगदी पीक असलेल्या उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात … Read more

आक्रमक ग्रामस्थांनी बंद पाडले अदानींच्या तारळेतील प्रकल्पाचे काम

Adani Project News

पाटण प्रतिनिधी | पाटण तालुक्यातील तारळे धरणावर कळंबे येथे होऊ घातलेल्या अदानी ग्रीन एनर्जी प्रोजेक्टला तारळे विभागातील 102 गावांनी आपला कडाडून विरोध कायम ठेवला आहे. हा प्रोजेक्ट कोणत्याही परिस्थितीत होवू न देण्यासाठी 102 गावातील नागरिकांनी एकत्रित येत या प्रकल्पाविरोधात आंदोलनाची भूमिका घेत प्रकल्पाचे काम काल बंद पाडले. ज्यावेळी पर्यावरणीय जनसुनावणीची जाहीर नोटीस प्रसिद्ध झाली, त्यावेळी … Read more

जिल्ह्यातील प्रमुख धरणांत अल्प पाणीसाठा; पाणीटंचाईचे संकट गडद

Dam News 20240603 120429 0000

सातारा प्रतिनिधी | जिल्ह्यातील प्रमुख धरणांत अल्प पाणीसाठा शिल्लक असल्याने पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. गत वर्षी कोयना, धोम, कण्हेर, उरमोडी, तारळी, बलकवडी या सहा धरणांत २६.३४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. मात्र मागील वर्षी कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख धरणे पूर्ण क्षमतेने भरली नाहीत. यंदा या प्रमुख धरणात १९.२४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. … Read more

जिल्ह्यात खरीप हंगामपूर्व कामास सुरुवात; कृषी विभागाकडे ‘इतक्या’ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी

Agriculture News 20240603 110132 0000

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून ऊस हे पीक घेतले जाते. ऊस पिकासोबत इतर पिके घेण्यास कृषी विभागाकडून सहाय्य केले जाते. यावर्षीचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी कृषी विभाग सज्ज झाला असून, चालू वर्षी 2 लाख 44 हजार 400 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचा अंदाज आहे. त्यासाठी कृषी विभागाने ४४ हजार ७९५ क्विंटल बियाण्यांची मागणी केली … Read more