कोयना धरणातून पाण्याच्या विसर्गात वाढ; नदीने ओलांडली धोक्याची पातळी

Koyna News 20240803 080837 0000

पाटण प्रतिनिधी | कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्याने कोयना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर कायमच आहॆ. त्यात हवामान खात्याने सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर केला आहे. गेल्या २४ तासांत धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे ९६ नवजा येथे १३१ तर महाबळेश्वर येथे १३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. … Read more

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; 24 तासांत 2 टीएमसी पाणीसाठ्यात वाढ

Koyna Rain News 20240802 132334 0000

पाटण प्रतिनिधी | भारतीय हवामान विभागाने सातारा जिल्ह्यासाठी उद्या शनिवारी व रविवारी अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. या दरम्यान धरणामध्ये येणाऱ्या अतिरिक्त पाण्याचा विचार करता धरणामधील विसर्ग वाढविणे आवश्यक होते. त्यामुळे कोयना धरणातील पाण्याच्या विसर्गात वाढ करुन तो आज शुक्रवारी सकाळी नऊ वाजता 50 हजार क्युसेक करण्यात आला आहे. आज कोयना धरणात 86.63 टीएमसी … Read more

कोयना धरणातून उद्या ‘इतका’ विसर्ग वाढणार, कोयना नदीच्या पाणीपातळीत होणार लक्षणीय वाढ

Koyna Dam Rain News 20240801 222100 0000

पाटण प्रतिनिधी | मुसळधार पावसामुळे कोयना धरणातील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या धरणात 86 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी उद्या शुक्रवारी कोयना नदी पात्रात विसर्ग वाढविण्यात येणार आहे. कोयना धरणात गुरूवारी (१ ऑगस्ट) सायंकाळी ५ वा. एकूण ८६.१९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून … Read more

जिल्ह्याला शनिवारपर्यंत ऑरेंज अलर्ट; कोयना धरणाचे दरवाजे 9 फुटांवर स्थिर

Koyna Rain News

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस पडत असून हवामान विभागानेही शनिवारपर्यंत आॅरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे पावसाच्या प्रमाणात वाढ होणार आहे. तर गुरूवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजा येथे १२४ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. कोयना धरणातही पाण्याची आवक कायम आहे. त्यामुळे धरणसाठा ८६ टीएमसीजवळ पोहोचला आहे. तसेच धरणातून विसर्ग कायम असल्याने दरवाजे ९ फुटांवर … Read more

मुसळधार पावसाचा इशारा; मूळगाव, निसरे फरशी, मेंढघर पूल पाण्याखाली

Patan Nisare News

पाटण प्रतिनिधी । गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू मुसळधार पावसाने पाटण तालुक्यात अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. उरुल भागातील ठोमसे, बोडकेवाडी, मोरेवाडी, गणेवाडी, तांबेवाडी पाच गावांना जोडणाऱ्या दोन्ही पुलावर पाणी आल्यामुळे किमान ७ तास गावांचा संपर्क तुटला. उरुलच्या पश्चिमेकडील फणशी कारी ओढ्यावरील ठोमसे व लहान-मोठ्या वाड्यांकडे जाणाऱ्या दोन्ही पुलावर बुधवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसाने … Read more

पुन्हा मुसळधार पाऊस; कोयना धरणात वाढला ‘इतका’ टीएमसी पाणीसाठा

Patan Rain News 20240801 092407 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील सर्वच प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने सहा धरणांतून एकूण ५८ हजार ४१८ क्युसेक प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग केला जात आहे. यामुळे कृष्णा, कोयना, तारळी, वेण्णा, उरमोडी नद्या दुधडी भरून वाहत आहेत. दरम्यान रात्रभर पडलेल्या पावसामुळे कोयना धरणात आज सकाळी आठ वाजेपर्यंत 85.81 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोयना धरण … Read more

साताऱ्यातील 195 वर्षांचा ऐतिहासिक महादरे तलाव लागला वाहू; पश्चिम भागाचा पाणीप्रश्न अखेर निकाली

Satara News 1 2

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यासह शहरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक तलाव, ओढे, नाले पाण्याने भरून वाहू लागले आहेत. शहराच्या पश्चिम भागाला पाणीपुरवठा करणारा सुमारे १९५ वर्षांचा ऐतिहासिक महादरे तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. सातारा पालिकेने सहा वर्षांपूर्वी या तलावातून मोठ्या प्रमाणात गाळ बाहेर काढलयामुळे तलावाच्या पाणीसाठ्यात तब्बल ५० लाख लिटरने वाढ झाली आहे. … Read more

सातारा जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट जारी; नदीसह नाले लागले दुथडी भरुन वाहू

Satara Rain News 2

सातारा प्रतिनिधी । गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात पावसानं चांगलाच जोर धरला आहे. जिल्ह्यात पश्चिमेकडील भागात चांगला पाऊस झाला आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टी देखील झाल्याच पाहायला मिळाले आहे. मुसळधार पावसामुळे शेती पिकांना फटका बसला आहे तर नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अक्षता आज सातारा जिल्ह्याला यलो अलर्ट जारो … Read more

‘धोम’च्या डाव्या कालव्यावरील पूल ढासळला; पाण्याच्या प्रवाहामुळे वाहतूक केली बंद

Dhom News

सातारा प्रतिनिधी । धोम डाव्या कालव्यावर कवठे केंजळ उपसा सिंचन योजनेलगत खानापूर ते शेंदुरजणे यांना जोडणाऱ्या पुलाचा काही भाग ढासळल्याची घटना घडली आहे. यावेळी कालव्यातून सुरू असलेले 100 क्युसेक पाणी ओढ्यातून वाहून गेल्याने कालव्यातील विसर्ग बंद करण्यात आला. जिहे कठापूर उपसा सिंचन योजनेसाठी कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष आ. महेश शिंदे यांच्या सूचनेप्रमाणे धोम धरणाच्या डाव्या … Read more

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार; धरण भरले ‘इतके’ टक्के

Koyna News 20240731 092302 0000

पाटण प्रतिनिधी | कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह पाटण तालुक्यात दोन दिवस पावसाचा जोर मंदावला होता. तरी धरणाची पातळी नियंत्रित करण्यासाठी मंगळवारी दुपारी धरणाचे सहा वक्री दरवाजे सात फुटांवरून नऊ फूट उचलण्यात आले असून विसर्ग वाढवण्यात आला आहे. दरम्यान, धरणात 85.59 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पडलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणातील पाणीपातळीत देखील … Read more

धोम धरणामधून 2600 क्युसेकने विसर्ग; कृष्णेला पूर, महागणपती मंदिर घाट पाण्याखाली

Satara News 20240731 082530 0000

सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वर तालुक्यासह वाई तालुक्याच्या पश्चिमेला पावसाचा जोर कायम असल्यामुळे मंगळवारी दुपारी धोम धरणामधून 2 हजार 600 क्युसेकने विसर्ग करण्यात आला. यामुळे कृष्णेला पूर आला असून, वाईतील प्रसिद्ध महागणपती मंदिर घाट पाण्याखाली गेला. अनेक मंदिरांमध्येही पुराचे पाणी शिरले असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, धोम धरण 84 टक्के भरले आहे. … Read more

धोम धरण पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरूच; धरणातून 2 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग

Dhom Dam News

सातारा प्रतिनिधी । वाई तालुक्यातील धोम धरण पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरूच आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास धरणातील पाणीसाठा ८२.५८ टक्के झाला होता. धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी आसरे बोगद्यातून कालव्यात १०० तर वीजगृहातून २०० असा ३०० क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तसेच सायंकाळच्या सुमारास सांडव्यावरुन २००० क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्याचे करण्यात आला. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत … Read more