आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीचे उत्पादन वाढविणे सहज शक्य : दत्तात्रय गायकवाड

Phalatan News 20240701 190326 0000

सातारा प्रतिनिधी | कृषी आणि फलोत्पादन क्षेत्रामध्ये फलटण तालुका अग्रेसर असून शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शेतीचे उत्पादन वाढविणे व आर्थिक उन्नती साधने सहज शक्य आहे, यासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभाग शेतकऱ्यांच्या सतत पाठीशी आहे.असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांनी केले. शेरेचीवाडी(ढवळ) ता. फलटण येथे हरितक्रांतीचे प्रणेते … Read more

कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; धरणाचा पाणीसाठा झाला ‘इतका’ TMC

Koyna news 20240701 123810 0000

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर चांगलाच वाढत असून सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत नवजा येथे 97 मिलीमीटर पाऊस पडला. तर कोयनानगर येथे 72 आणि महाबळेश्वरला 155 मिलीमीटरची नोंद झाली आहे. या पावसामुळे कोयना धरणात पाण्याची चांगली आवक सुरू झाली आहे. मागील 3 आठवड्यापासून पाऊस पडत आहे. पूर्व तसेच पश्चिम भागातही पावसाने दमदार … Read more

गावठाण हद्दीत आजपासून शंभर वृक्षांची लागवड; जुलैअखेर राबवली जाणार मोहीम

Satara news 20240701 091858 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दि. १ ते २८ जुलैअखेर महाराष्ट्र कृषिदिन ते जागतिक संवर्धन दिनापर्यंत वृक्षारोपण मोहीम जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत राबवण्यात येणार आहे. गावठाण परिसरात सुमारे १०० झाडे लावण्यावर भर दिला जाणार आहे. सातारा जिल्ह्यात मार्च २४ ते मे २४ या कालावधीत उच्चांकी तापमान झाले होते. वृक्ष लागवड कालाधीत ग्रामपंचायतींनी … Read more

कासच्या पाणीकपात अन् अपुरा पाणीपुरवठ्यामुळे सातारकर झाले हैराण

Satara News 20240630 140235 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा शहराची लाईफलाईन असलेल्या कास तलावामध्ये तब्बल 45 फूट पाणीसाठा आहे. अजूनही म्हणावा तसा पावसाने अपेक्षित जोर धरलेला नसला तरी मात्र, काही दिवसांपूर्वी झालेल्या पूर्व मोसमी दमदार पावसाने कासची पाणी पातळी सहा फुटाने वाढली आहे. तरीही सातारा नगरपालिका पाणी कपातीचे वेळापत्रक मागे घ्यायला तयार नाही. परिणामी कास तलावातून वारंवार होणारा अपुरा पाणीपुरवठा … Read more

कराड शेती उत्पन्न बाजार समितीत संचालक मंडळाच्या बैठकीत सभापती विजयकुमार कदम यांचा राजीनामा

Karad News 20240630 121435 0000

कराड प्रतिनिधी | कराड शेती उत्पन्न बाजार समितीत चांगल्याच राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत. सभापती विजयकुमार कदम यांनी शनिवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत सभापती पदाचा राजीनामा दिला आहे. सहकार उपनिबंधक यांच्या मंजुरीनंतर राजीनामा अंतिम होऊन नव्या सभापतीची निवड करण्यात येणार आहे. कराड शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणूक मागील वर्षी मोठ्या चुरशीने झाली. बाजार समितीतील सत्ताधारी … Read more

कोयना धरणाचा पाणीसाठा झाला ‘इतका’ TMC

Koyna Dam News 20240630 110257 0000

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर चांगलाच वाढत असून रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंत नवजा येथे 55 मिलीमीटर पाऊस पडला. तर कोयनानगर येथे 73 आणि महाबळेश्वरला 54 मिलीमीटरची नोंद झाली आहे. या पावसामुळे कोयना धरणात यावर्षी प्रथमच आवक सुरू झाली आहे. मागील 20 दिवसांपासून पाऊस पडत आहे. पूर्व तसेच पश्चिम भागातही पावसाने दमदार … Read more

सातारा जिल्ह्यात पेरणीला वेग; शेतकऱ्यांनी दिली बाजरीसह भाताला अधिक पसंती

Satara News 26 1

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात मान्सून चांगला बरसल्यामुळे खरीप हंगामातील पेरणीला वेग आला आहे. जून महिना संपण्यापूर्वीच १ लाख ४५ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. टक्केवारीत हे प्रमाण ५० इतके झाले आहे. त्यामुळे यंदा १०० टक्के पेरणीचा अंदाज आहे. तर सध्या भात लागण, बाजरी, ज्वारी, मका पेरणीला वेग आला आहे. जिल्ह्यात खरीप आणि रब्बी असे … Read more

फोर्टिफाईड तांदळाबाबत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून महत्वाचे आवाहन

Satara News 24 1

सातारा प्रतिनिधी । फोर्टिफाईड तांदळाचे अनुषंगाने सध्या अफवा पसरवल्या जात आहे. या अफवांबाबत तसेच तांदळाबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी महत्वाचे आवाहन केले आहे. तांदळाबाबत लाभार्थ्यांना काही शंका, अडचणी असल्यास आपल्या तालुक्यातील तहसिल कार्यालयातील पुरवठा शाखेशी अथवा जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी राजमाने यांनी केले आहे. केंद्र शासनाच्या … Read more

कोयना धरणात पाण्याची आवक वाढली; नवजाला 28 तर महाबळेश्वरला ‘इतक्या’ मिलीमीटर पावसाची नोंद

Koyna Rain News

पाटण प्रतिनिधी । जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सक्रीय झाला असून गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना येथे 23, नवजा 28 आणि महाबळेश्वरला 25 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर कोयना धरणातही पाण्याची आवक वाढली आहे. धरणात सध्या 17.07 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. मागील आठवड्यात पावसाचे प्रमाण कमी झाले होते. पश्चिमेकडील कास, बामणोली, तापोळा, कोयना, नवजासह … Read more

कास परिसरातील डोंगरमाथ्यावर वन्य प्राण्यांकडून पिकांची नासधूस; शेतकरी हतबल

Agriculture News 1

सातारा प्रतिनिधी । वादळी वारा, मुसळधार पावसाची पर्वा न करता शहराच्या पश्चिमेकडील कास परिसरातील शेतकऱ्यांकडून भातशेती केली जाते. दरम्यान, डोंगरमाथ्यावरील भागातील जंगली प्राण्यांकडून भातशेतीचे व नाचणीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले जात आहे. या नुकसानीमुळे परिसरातील शेतकरी हतबल झाले असून त्यांनी नुकसान होऊ नये म्हणून शेताला कुंपण घातले आहे. साताऱ्यापासून काही अंतरावर असलेल्या कास परिसरातील … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर; कृषी विभागाकडून अन्नधान्य, कडधान्यसह 11 पिकासाठी पीक स्पर्धचे आयोजन

Agriculture News

सातारा प्रतिनिधी । कृषि विभागामार्फत सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या अशा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. खरीप हंगाम सन २०२४-२५ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ख. ज्वारी, बाजरी, मका नाचणी (रागी) तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल या ११ पिकासाठी पीक स्पर्धा घेण्यात येणार आहे. पीक स्पर्धेतील पिके – खरीप पिके भात, ख. ज्वारी, … Read more

पालकमंत्री देसाईंनी पाटण तालुक्यातील विकास कामावरून अधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ सूचना आढावा

Patan News 3 1

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण तालुक्यात सुरु असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी पाटण तालुक्यातील रस्त्यांचे डांबरीकरण पावसाळ्यानंतर करावे, बांधकामाची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. मातोश्री पाणंद रस्त्याची चारशेहून अधिक कामे मंजूर आहेत. ही कामे लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी प्रत्येक ग्रामसेवकाला तीन ते चार कामे वाटून द्यावीत, … Read more