धोम-बलकवडी कालव्याचे आवर्तन झाले बंद; मुळीकवाडी धरण काठावर

Phalatan News 20240923 164941 0000

सातारा प्रतिनिधी । ऑगस्ट महिन्यात धोम-बलकवडी उजव्या कालव्याचे आवर्तन सुटल्याने नालाबांध, सिमेंट बंधारे, पाझर तलाव भरले; पण चार गावांना पाणीपुरवठा करणारे व हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणणारे मुळीकवाडी धरण धोम -बलकवडीच्या पाण्याने काठावर भरल्याने समाधान व्यक्त होत आहे. तांबवे, हणमंतवाडी, हिंगणगाव, मुळीकवाडी ही दुष्काळी भागातीत प्रमुख धरणे आहेत. सर्व धरणे नैसर्गिक सर्व धरणे नैसर्गिक पाण्याने … Read more

बांबू लागवडीसाठी पाटण तालुक्यात 1 हजार 334 प्रस्ताव प्राप्त

Bamboo News 20240923 144301 0000

पाटण प्रतिनिधी । दरवर्षी 18 सप्टेंबर रोजी जागतिक बांबू दिन साजरा केला जातो. शाश्वत विकासामध्ये बांबूचे महत्त्व आणि जागतिक अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि समुदायांसाठी त्याचे अनेक फायदे याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. जागतिक बांबू दिनानिमित्ताने राज्य शासनाच्या प्रयत्नामुळे पाटण तालुक्यात बांबू लागवडीसाठी शेतकरी व प्रशासनाने आघाडी घेतली आहे. बांबू लागवडीसाठी पाटणच्या विविध शासकीय … Read more

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार; धरण भरलं ‘इतके’ TMC

Koyna News 20240923 123239 0000

पाटण प्रतिनिधी । कोयना धरण पाणलोट क्षेत्रात काल रविवारी पावसाने चांगली हजेरी लावली. सायंकाळनंतर पाटणसह कराड तालुक्यातील काही भागाला पावसाने चांगलेच झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक होऊ लागली आहे. दरम्यान, कोयना धरणात 102.76 टीएमसी इतका पाणीसाठा असून धरण 97.63 टक्के भरलं आहे. कराड तालुक्यातील काही भागात काल मुसळधार पावसाने हजेरी लावली. सायंकाळी … Read more

जिल्हयातील सात तालुक्यांतील 2083 शेतकऱ्यांना पावसाचा फटका

Satara News 20240922 210536 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून पावसामुळे सात तालुक्यांमधील २ हजार ८३ शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसला आहे. सुमारे ५२८.३९ हेक्टर बागायत व जिरायत क्षेत्रावरील खरिप शेती क्षेत्र उद्ध्वस्त झाले आहे. सर्वाधिक फटका फलटण तालुक्याला बसला आहे. फलटण तालुक्यात १ हजार १३३ शेतकऱ्यांचे ४३४.३४ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे. यावर्षी खरीप हंगामात कमी … Read more

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी आधार प्रमाणीकरणासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

Satara News 20240922 164242 0000

सातारा प्रतिनिधी । महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण व मयत शेतकऱ्यांचे वारसांनी वारसनोंदणी करण्यासाठी देण्यात आली आहे. दिनांक 30 सप्टेंबरपर्यंत शासनाची मुदतवाढ देण्यात आली असून शेतकऱ्यांनी मुदतीत आधार प्रमाणीकरण व वारस नोंद करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रीक यांनी केले आहे. महात्मा फुले शेतकरी … Read more

वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन चळवळ गावोगावी उभी रहावी : वैभव राजेघाटगे

Agri News 20240921 183448 0000

सातारा प्रतिनिधी | भौतिक सुविधांचा विकास करताना आपणच पर्यावरणाची मोठी हानी करत आहोत. त्यामुळे भविष्यात उद्भवणाऱ्या संकटांचा सामना करताना भावी पिढीला त्रास होऊ नये म्हणून शासन तसेच सामाजिक संघटना व ट्रस्ट यांच्या माध्यमातून वृक्षारोपण लावलेल्या वृक्षांचे संवर्धन अशी चळवळ गावोगावी उभी राहिली पाहिजे, असे प्रतिपादन गृहविभागाचे सहसचिव वैभव राजेघाटगे यांनी केले. पुसेगाव, ता. खटाव येथून … Read more

सातारा जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस; खरीप पेरणी झाली 106 टक्के

Satara Agri News 20240921 171424 0000

सातारा प्रतिनिधी | जिल्ह्यात जूनपासूनच वरुणराजा प्रसन्न झाला आहे. सलग तीन महिने पाऊस पडल्याने यावर्षी खरीप हंगामातील पेरणी १०६ टक्के झाली आहे. ३ लाख ५ हजार हेक्टर क्षेत्र पिकाखाली आहे. तर जिल्ह्यातील ७ तालुक्यांत १०० टक्क्यांवर पेरणी झालेली आहे. जिल्ह्यात सर्वत्र पावसाने समाधानकारक हजेरी लावली. त्यामुळे जूनच्या मध्यापासूनच खरीप पेरणीला सुरूवात झाली. खरीपातील पेरणी पूर्ण … Read more

कराडात क्रूरपणे डांबून ठेवलेल्या 21 जनावरांची सुटका; एकावर गुन्हा दाखल

Karad News 20240921 052457 0000

कराड प्रतिनिधी | कत्तल करण्याच्या उद्देशाने क्रूरपणे डांबून ठेवलेल्या २१ जनावरांची पोलिसांच्या मदतीने सुटका करण्यात आली. कराड येथील बाजार समिती आवारात असलेल्या एका शेडमध्ये छापा टाकून ही कारवाई करण्यात आली. याबाबत प्रतीक आप्पासाहेब ननावरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुलाम हाजी व्यापारी (रा. सदर बाजार, सातारा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कराडमधील बाजार समिती आवारात असलेल्या … Read more

कराड होतंय ‘ग्रीन सिटी’; लोकसंख्येच्या तुलनेत 40 टक्के वृक्ष

Karad News 20240918 163221 0000

कराड प्रतिनिधी | कराड शहरात तशी पहिली तर वृक्षांची संख्या ही जास्त आहे. सुमारे तीन वर्षांपूर्वी कराड पालिकेकडून वृक्षगणना करण्यात आली. त्यावेळी ३७ हजारांपेक्षा जास्त वृक्षसंख्या होती. मात्र, त्यावेळी तीन मीटरपेक्षा कमी उंचीचे वृक्ष मोजण्यात आले नव्हते. सध्या या वृक्षांची उंची वाढली असून, एकूण वृक्षसंख्या पन्नास हजारांवर पोहोचली असल्याची समाधानकारक बाब पालिकेच्या पाहणीतून समोर आली … Read more

दुष्काळाचे सावट दूर झाले, कोयना धरण ‘इतके’ टक्के भरले

Koyna News 20240918 152452 0000

पाटण प्रतिनिधी | जिल्ह्याच्या पश्चिम भागासह सर्वत्र पावसाने उघडीप दिली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या पावसामुळे कोयना धरणात चांगला पाणीसाठा झाला असून धरणातील पाणीसाठा 104.60 टीएमसीवर गेला आहे. तर धरणात 99.48 टक्के पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यात मागील तीन महिन्यांपासून जूनपर्यंत चांगला पाऊस झाला. तर जुलैमध्ये अतिवृष्टी झाली होती. यामुळे पश्चिम भागातील तळ गाठलेल्या धरणात मोठ्या प्रमाणात … Read more

सातारा जिल्ह्यात घेतली जातात तब्बल 40 प्रकारची फळे

Satara News 20240918 134316 0000

सातारा प्रतिनिधी | वातावरण अनुकूल, जमिनीची सुपीकता तर दुसरीकडे विभागानुसार ३०० ते ५ हजार मिलिमीटरपर्यंत पडणारा पाऊस अशा वैविध्यपूर्ण वातावरणामुळे जिल्ह्यात सुमारे ७ हजार हेक्टरवर तब्बल ४० प्रकारची फळे घेण्यात येत आहेत. तसेच जिल्ह्यातून द्राक्ष, डाळिंबाची अनेक देशात निर्यात होते. यामुळे सातारा जिल्हा महाराष्ट्राचे फ्रूट बास्केट म्हणून पुढे येत आहे. महाबळेश्वर, कोयनानगर येथे तर जून … Read more

सातारा जिल्ह्यात ‘लम्पी’ने 13 जनावरांचा मृत्यू

Satara News 20240917 132318 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा लम्पी स्कीन या आजाराने शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे. खटाव, महाबळेश्वर, पाटण तालुके वगळता जिल्ह्यात बाधित जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून लम्पीने जिल्ह्यात १३ जनावरांचा मृत्यू झाला असून, ५१० जनावरे बाधित आढळून आली आहेत. जिल्ह्यात विविध ठिकाणी सध्या १३९ जनावरांवर उपचार सुरू आहेत. पशुसंवर्धन विभागाकडून युद्धपातळीवर जनावरांचे लसीकरण करण्यात … Read more