औंधसह 16 गावांतील ग्रामस्थांनी ठेवला कडकडीत बंद; नेमकं कारण काय?

Aaundh News 20240930 064442 0000

सातारा प्रतिनिधी | खटाव तालुक्यातील महत्वाच्या अशा औंधसह 16 गावांच्या शेती पाणी प्रश्नी मागील आठ दिवसांपासून सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय जगदाळे यांच्याकडून उपोषण सुरू असून रविवारी शासनाच्या वेळकाढूपणा व दुर्लक्षाबाबत औंधसह सोळा गावातील आर्थिक व्यवहार व दुकाने बंद ठेऊन तसेच औंध येथे मोर्चा काढून शासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी औंध गावातून भव्य निषेध रॅली काढण्यात आली. … Read more

तुळशी वृंदावन धरणाचे ग्रामस्थांनी केले जलपूजन

Tulasi Vrindavan Dam News 20240930 060533 0000

सातारा प्रतिनिधी | लोणंद व खेड बुद्रुक गावाच्या सीमेवर असणारे तुळशी वृंदावन धरण यंदा पूर्ण क्षमतेने भरले असून धरणातील पाण्याचे जलपूजन लोणंद व खेड बुद्रुक ग्रामस्थांच्यावतीने ज्येष्ठ नेते मिलिंद पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या धरणात मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा झाल्याने खेड बुद्रुक व लोणंद गावातील शेतकऱ्यांच्या शेतीसाठीच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. तुळशी वृदांवन धरणातील पाणी … Read more

कोयना धरणाचे दरवाजे 2 फुटांवर; 21 हजार क्युसेक पाण्याचा नदीत विसर्ग

WhatsApp Image 2024 09 29 at 7.14.34 PM

कराड प्रतिनिधी | जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने आज उघडीप दिली असून मात्र, गेल्या दोन दिवसात कोयना, नवजा आणि महाबळेश्वरला चांगली मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर कोयना धरणात पाण्याची आवक कायम असल्याने दरवाजे दोन फुटांवर स्थिर आहेत. त्यामुळे दरवाजे आणि पायथा वीजगृह असे मिळून २१ हजार क्युसेक पाणी विसर्ग होत आहे. आतापर्यंत माण, खटाव, फलटण, … Read more

शेळी-मेंढी गटासाठी मिळतेय ‘इतके’ टक्के अनुदान; एकदा अर्ज केल्यास 5 वर्षात कधीही होते निवड

Satara News 20240929 142821 0000

सातारा प्रतिनिधी | महाराष्ट्रातील बहुतांशी लोक हे शेतीवर अवलंबून आहेत. शेतकऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे शेतीसोबत जोड व्यवसाय म्हणून शेतकरी शेळी-मेंढी तसेच गाय- म्हशीचे पालन करतात. यामध्ये राज्य शासनही राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेतून शेळी-मेंढी गटासाठी ७५ टक्के अनुदान देत आहे. यात एकदा अर्ज केला की पाच वर्षांत कधीही निवड होत असते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर … Read more

साखर कारखान्यांचे धुरांडे पेटू देणार नाही; बळीराजा संघटनेच्या पंजाबराव पाटलांचा इशारा

Panjabrav Patil News 20240929 101352 0000

कराड प्रतिनिधी | ऊसाला गत गळीत हंगामाचा 500 रुपयांचा दुसरा हप्ता साखर कारखानदारांनी दिवाळीपूर्वी द्यावा. तसेच आगामी गळीत हंगामाची पहिली उचल 4 हजार रुपये मिळाली पाहिजे. दिवाळी सणाला 500 रुपयांचे बिल न दिल्यास साखर कारखान्यांची धुरांडी पेटू देणार नाही, असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी दिला. कराड तालुक्यातील कार्वे येथे बळीराजा … Read more

सर्व कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी फलटणची कांदाबाजार पेठ प्लॅस्टिमुक्त करावी : चेतन घडिया

Phalatan News 20240929 094520 0000

सातारा प्रतिनिधी | फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात नुकतीच वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी सर्व कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी प्लॅस्टिमुक्त फलटणची कांदाबाजार पेठ करण्यासाठी पुढाकार घेत प्लॅस्टिक मुक्त बाजारपेठेचे मानकरी व्हावे असे आवाहन भुसार कांदा अडत व्यापारी असोसिएनशचे नवनिर्वाचिन अध्यक्ष चेतन घडिया यांनी केले. भूसार कांदा अडत व्यापारी असोसिएशन व फलटण कृषी उत्पन्न बाजार … Read more

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला; कोयना धरणातून 11 हजार 646 क्यूसेकने विसर्ग

Koyna News 20240928 082723 0000 1

पाटण प्रतिनिधी | जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर असून २४ तासांत महाबळेश्वरला ११४ मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयना धरणात आवक वाढल्याने मध्यरात्रीच्या सुमारासच दरवाजातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, शनिवारी सकाळच्या सुमारास कोयना धरण दुसऱ्यांदा पूर्ण भरले. धरणात १०५.२५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १० तर नवजाला … Read more

सुपनेमधील टेंभू प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या बैठकीत जमीन मोबदला प्रक्रियेविषयी चर्चा

Karad News 20240927 160708 0000

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील सुपने व पश्चिम सुपने येथील टेंभू उपसा सिंचन प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या वतीने प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता व प्रांताधिकाऱ्यांना आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.त्याच्या इशाऱ्यानंतर प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी सुपने येथे जाऊन बाधित शेतकऱ्यांसोबत बैठक घेऊन जमीन मोबदला मिळण्याच्या प्रक्रियेविषयी चर्चा केली. सुपने व पश्चिम सुपने परिसरातील टेंभू प्रकल्पबाधित जमिनीचे सर्वेक्षण होऊन तेरा वर्षे उलटून … Read more

कास पठारावर 17 रानगव्यांचा कळपाची एन्ट्री; पर्यटकांची पळता भुई थोडी

Kas News 20240927 145753 0000

सातारा प्रतिनिधी | जागतिक वारसास्थळाचं कोंदण लाभलेल्या कास पठारावरील फुलांचा हंगाम सध्या बहरात आहे. देश-विदेशातील पर्यटक कास पठाराला भेट देत आहेत. अशातच रानगव्यांच्या कळपानं एन्ट्री केल्यामुळे पर्यटकांची पळता भुई थोडी झाली. साताऱ्यापासून पश्चिमेकडे १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या कास पठारावरील फुलांचा हंगाम सध्या बहरात आहे. या फुलोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांची गुरूवारी पळता भुई थोडी झाली. … Read more

ग्रामपंचायतीमध्ये नलजल मित्रांची नियुक्ती; पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचा उपक्रम

Satara News 20240927 090713 0000

सातारा प्रतिनिधी | जल जीवन मिशन अंतर्गत ■ राज्यातील पाणीपुरवठा योजनेची देखभाल व दुरुस्ती होणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये गवंडी, प्लंबर, मोटर मेकॅनिक, फिटर व इलेक्ट्रिशियन, पंप ऑपरेटर याप्रमाणे तीन नल-जल मित्रांची नेमणूक केली जाणार आहे. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध होणार आहे. जलजीवन मिशन अंतर्गत … Read more

वांग-मराठवाडी धरणग्रस्त काढणार कावड यात्रा; धरणग्रस्तांचे जलसत्याग्रह आंदोलन

Protest News 20240927 082146 0000

पाटण प्रतिनिधी | जमिनींना पसंती दिली नसतानाही नापसंत जमिनी धरणग्रस्तांच्या नावे करण्यात आल्या असून, त्या नोंदी तातडीने रद्द कराव्यात. धरणग्रस्तांच्या मागणीनुसार पुनर्वसनाचा लाभ देण्यात यावा, याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जनजागर प्रतिष्ठानकडून वांग-मराठवाडी धरणाच्या जलाशयात उतरून धरणग्रस्तांनी जलसत्याग्रह आंदोलन केले. आंदोलनानंतरसुद्धा शासन व प्रशासनाने योग्य ती दखल न घेतल्यास वयोवृद्ध धरणग्रस्त महिलेस कावडीमध्ये बसवत ढेबेवाडीतून मंत्रालयापर्यंत … Read more

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार; 2 हजार 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग

Patan News 14

पाटण प्रतिनिधी । परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. दरम्यान, बुधवारी रात्री खटाव तालुक्यातील मायणीत ढगफुटीसदृश पाऊस झाला. त्यामुळे गावातील अनेक घरांत पाणी शिरले. गुरुवारी देखील दिवसभर पावसाची रिपरिप सुरु असल्याने कोयना धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्याने धरणात गुरुवारी सायंकाळपर्यंत 104.28 TMC पाणीसाठा झाला तर … Read more