उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना केलं फॉलो; पडद्यामागे नेमकं घडतयं काय?

0
1
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीतील यशानंतर गुरुवारी दि. ५ डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यात सरकार स्थापन झाले असले तरी मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे अनेकाचं लक्ष लागले आहे. एकनाथ शिंदे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील दरे गावचे असून त्यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथेमुळे जिल्ह्याला प्रथमच उपमुख्यमंत्री पद मिळाले असले तर त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन ४८ तास उलटत नाहीत तोच महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठया भूकंपाचे संकेत दिलेत. एकनाथ शिंदे यांनी आपल्या अधिकृत फेसबूक (Facebook) अकाउंट वर चक्क उद्धव ठाकरेंच्या शिवसेना फेसबूक पेजला (ShivSena) फॉलो केलं आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पेजवरुन केवळ चार जणांच्या पेजला फॉलो करण्यात आले आहे. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या पेजला फॉलो करण्यात आले आहे. त्यांच्या या प्रकारची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. खरे सांगायचे झाले तर मागील अडीच वर्षातील महाराष्ट्राचे राजकारण गाजले असेल तर ते एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे या सत्तासंघर्षाने होय.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेतून एकनाथ शिंदेनी ४० आमदार फोडले, बंड देखील केले आणि थेट सुरत – गुवाहाटी गाठली. छातीठोकपणे मातोश्रीलाच आव्हान देत महाविकास सरकार पाडले आणि आपल्याच पक्षाचे तत्कालीन पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून पायउतार केलं. भाजपसोबत सत्ता स्थापन केली आणि स्वतः एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर आरूढ झाले. यानंतर आज अखेर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकमेकांवर सडकून टीका करू लागले.

एकनाथ शिंदेंना ‘मुख्य’ ऐवजी ‘उप’ खुर्चीवर बसावे लागले

उद्धव ठाकरे यांच्याविरोधात जाऊन एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षांपूर्वी भाजपशी हातमिळवणी केली. त्याचे बक्षीस म्हणून महाशक्तीने त्यांना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवले. शिंदे यांनीही आपले कार्यकर्तृत्व सिद्ध केले. अडीच वर्षांचे यशस्वी सरकार चालविल्यानंतर निवडणुका पार पडल्या. महायुतीला जोरदार समर्थन मिळाले. परंतु यंदा भाजपला १३२ जागा जिंकता आल्याने एकनाथ शिंदे यांना ‘मुख्य’ ऐवजी ‘उप’ खुर्चीवर बसावे लागले. यानंतर शिंदेनी महत्वाच्या खात्यांसाठी आग्रह धरला, मात्र तिथेही भाजपने त्यांना ठेंगा दाखवला.

महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या भूकंपाचे संकेत?

त्यातच अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत असल्याने एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग पॉवरच संपल्यात जमा झाली आहे. सुरुवातीला नाही नाही म्हनणाऱ्या शिंदेनी अखेर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली खरी, पण त्यांनी अचानकपणे उद्धव ठाकरेंना फॉलो केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या भूकंपाचे संकेत येत आहेत.

अचानक फॉलो कस काय केलं?

ठाकरेंचा शत्रू शिंदे आणि शिंदेंचा शत्रू ठाकरे या संघर्षाने मूळ आणि कडवट शिवसैनिक मात्र, पुरता खचला. आता एवढं सगळं रामायण झाल्यानंतर एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंना अचानक फॉलो कस काय केलं? पडद्यामागे नेमक्या कोणत्या घडामोडी चालल्यात? उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे पुन्हा एकत्र येतील का? असे अनेक उपस्थित झाले आहेत.

2 दिवस उलटत नाहीत तोच शिंदेंकडून ठाकरेंच्या पक्षाच्या फेसबुक पेजला फॉलो

महत्त्वाची खाती मिळत नसल्याच्या कारणावरून भारतीय जनता पक्षावर नाराज असलेल्या एकनाथ शिंदे यांनी शपथ घेऊन २ दिवस उलटत नाहीत तोच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या फेसबुक पेजला फॉलो केले आहे. त्यामुळे शिंदे उद्धव ठाकरे यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करीत आहेत की ठाकरे यांच्या पक्षाला फॉलो करणे, ही त्यांच्याकडून अनावधानाने झालेली चूक आहे, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.