तब्बल 30 वर्षानंतर ‘त्यांनी’ अंगावर चढवली पोलिसाची वर्दी; असं नेमकं काय घडलं?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील अनेक तरुण आणि तरुणी पोलिस सेवेत दाखल होण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. पोलिस होऊन अंगावर खाकी वर्दी चढवावी असे वाटत असते. मात्र, पोलिस दलात भरती होऊन अवघी एक वर्षे सेवा केल्यानंतर पुढे 30 वर्षे झाली जात प्रमाणपत्राच्या प्रकरणात खाली वर्दी अंगावर न घातलेल्या वाई येथील बळवंत पडसरे यांचे एक वर्षाच्या सेवेनंतर अनुसूचित जमाती पडताळणी समितीने प्रमाणपत्र अवैध ठरवले आहे. त्यांनी तब्बल 30 वर्षांनी अंगावर खाकी वर्दी चढवली आहे. बळवंत पडसरे पोलिस दलात असताना याविरोधात त्यांनी ‘ऑफ्रोह’ संघटनेच्या नेतृत्वाखाली लढा दिला.त्यामुळे ३० वर्षांनंतर का असेना डिसेंबर २०१९ मधील शासन निर्णयानुसार पडसरेंना न्याय मिळाला आहे.

पोलिस अधीक्षकांनी अधिसंख्य पदाचा आदेश दिल्याने पडसरे यांच्या अंगावर आता पोलिसांची वर्दी आलेली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, महादेव कोळी समाजातील सेवासमाप्त कर्मचारी बळवंत पडसरे हे जिल्हा पोलिस दलात होते. १९८९-९० दरम्यान वाई येथे पोलिस म्हणून कार्यरत असताना एक वर्षाच्या सेवाकार्य कालावधीनंतर पुणे येथील अनुसूचित जमातीच्या पडताळणी समितीने निकाल देऊन त्यांचे अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविले होते. तर नोकरीसाठी पडसरेंनी ‘ऑफ्रोह’च्या नेतृत्वाखाली उपोषण केले. तसेच ‘ऑफ्रोह’च्या पाठपुराव्यानंतर बळवंत पडसरेंना न्याय मिळाला आहे.

पोलिस अधिक्षक समीर शेख यांनी 11 सप्टेंबरला पडसरेंना अधिसंख्य पदाचे आदेश दिले आहेत. त्यामुळे त्यांना आता पोलिसाची नोकरी मिळाली आहे. तर नोकरी गेल्यानंतर पडसरे यांनी अनेक ठिकाणी अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला होता. पण, तो असफल ठरलेला होता. आता त्यांना न्याय मिळालेला आहे.