सातारा प्रतिनिधी | अॅड. उज्ज्वल निकम यांनी लोकसभेची निवडणूक सत्ताधारी पक्षाकडून लढवलेली असल्यामुळे ते सरकारी वकील म्हणून राहण्यास अपात्र आहेत. त्यामुळे त्यांना माझ्याशी संबंधित खटल्याचे कामकाज चालविण्यास बंदी घालावी. हा खटला चालवण्यास माझी हरकत असल्याचा धोम वाई खून खटल्याचा मुख्य आरोपी संतोष पोळ याने न्यायालयाला केलेला अर्ज न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावला.
धोम वाई खून खटल्याची सुनावणी वाई येथील विभागीय जिल्हा न्यायालयात जिल्हा न्यायाधीश न्या. निकम यांच्यासमोर सुरू आहे. त्यासाठी संतोष पोळ याला न्यायालयात आणण्यात आले होते. सुनावणीसाठी सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम, सहायक मिलिंद ओक उपस्थित होते.
संतोष पोळ याच्या हरकतीवर वाई : अॅड. उज्ज्वल निकम यांनी लोकसभेची निवडणूक सत्ताधारी पक्षाकडून लढवलेली असल्यामुळे ते सरकारी वकील म्हणून राहण्यास अपात्र आहेत. त्यामुळे त्यांना माझ्याशी संबंधित खटल्याचे कामकाज चालविण्यास बंदी घालावी. हा खटला चालवण्यास माझी हरकत असल्याचा धोम वाई खून खटल्याचा मुख्य आरोपी संतोष पोळ याने न्यायालयाला केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला.
धोम वाई खून खटल्याची सुनावणी वाई येथील विभागीय जिल्हा न्यायालयात जिल्हा न्यायाधीश न्या. निकम यांच्यासमोर सुरू आहे. त्यासाठी संतोष पोळ याला न्यायालयात आणण्यात आले होते. सुनावणीसाठी सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम, सहायक मिलिंद ओक उपस्थित होते.
संतोष पोळ याच्या हरकतीवर न्यायालयात दोन्ही वकिलांनी युक्तिवाद केला. यानंतर संतोष पोळ याचा हरकत अर्ज फेटाळून लावला. या खटल्यातील साक्षीदार डॉ. विद्याधर घोटवडेकर आणि त्यांची पत्नी हे भाजप आणि संघाचे कार्यकर्ते आहेत आणि उज्वल निकम यांनी भाजपाकडून निवडणूक लढवली आहे. त्यामुळे उज्ज्वल निकम घोटवडेकर यांच्या बाजूने साक्ष घेतील व त्यांना निर्दोष सोडतील.
खटल्याच्या अनुषंगाने ते साक्ष घेणार नाहीत असे न्यायालयाच्या निदर्शनास आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या निवडणुकीचा या खटल्यावर मोठा परिणाम होईल, असेही त्याने न्यायालयात सांगितले. त्यामुळे उज्ज्वल निकम यांना हा खटला लढविण्यास अपात्र ठरवावे, असेही पोळच्या वतीने न्यायालयास सांगितले. मात्र, न्यायालयाने त्याचे सर्व आरोप फेटाळून लावले. पोळ याच्या वतीने अॅड. दिनेश धुमाळ यांनी काम पाहिले.