सातारा प्रतिनिधी । एसटी कामगारांचे नेते गुणरत्न सदावर्ते आपल्या वादग्रस्त विधाने प्रसिद्ध आहेत. सदावर्ते यांनी नथुराम गोडसे यांचा फोटो छत्रपती शिवाजी महाराज क आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत लावल्यामुळे ते चर्चेत आले होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर साताऱ्यात निशाणा साधला आहे. शरद पवार हे जे वैचारिक व्हायरस आहे. या व्हायरसचा स्प्रेड थांबला पाहिजे आणि निर्जंतुकीकरण झाले पाहिजे. ते करण्यासाठी मी या सातारा नगरीत सभा घेत आहे, अशी टीका ॲड. गुणरत्न सदावर्तें यांनी साताऱ्यात केली.
ॲड. गुणरत्न सदावर्तें एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज साताऱ्यात आले होते यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, शरद पवारांच्या वैचारिक वायरसचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी राज्यभर सभा आणि बैठका घेणार आहे. सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेऊन चैत्यभूमी पासून शरद पवार व्हायरसचे निर्जंतुकीकरण रॅलीला सुरुवात करणार आहे. आज सातारा नगरीत आलो आहे.
या ठिकाणीही पवारांनी राजकारण केले. काही कुटूंबात भांडणे लावून त्यांना विभक्त केले. ज्या बॅँकेची स्थापना कष्टकरी शेतकरी, कामगार वर्ग, एसटी कर्मचारी यांच्या हितासाठी करणे आवश्यक होते. मात्र, पवारांच्या वैचारिक व्हायरसमुळे त्यांना याचा फायदा झाला नाही. हि कष्टकऱ्यांची बँक पवारांचा व्हायरस बाजूला करून ड्रायव्हर, मेकॅनिकल व एसटी कर्मचाऱ्यांच्या हाती देण्यासाठी मी आलो आहे. वेगळा मराठवाडा मागणीवर मी ठाम आहे. छोटी राज्य निर्मिती मधून अंतर्गत विकास आहे ही संविधनिक मागणी आहे.
यापूर्वी सुद्धा विदर्भ आणि मराठवाडा वेगळा होण्याच्या मागण्या झाल्या होत्या आणि त्यात काही गैर नाही. एसटी विलनिकरणाची माझी भूमिका कायम आहे. विलीनीकरण चर्चेची खोटी सुरवात शरद पवारांनी केली. शरद पवार यांची कुटुंब कुटुंब विभक्त करण्याची सवय आहे. साताऱ्यात सुद्धा त्याचा वापर त्यांनी केला (राजघराणे) तसेच कष्टकाऱ्यांमध्ये सुद्धा त्यांनी प्रयत्न केला.
नथुराम गोडसेंच्या विचारांना चुकीच्या पद्धतीने मांडल गेलं. नुसत तेवढं नाही तर त्यांच्या बरोबर फेअर ट्रायल झाली नाही. महाराष्ट्रात सर्व वर्गात मगासलेपणा आहे. त्यासाठी ईड्ब्लूएसची तरतूद आहे. शरद पवारांनी याबाबत राजकारण केलं. ज्या गोष्टी मिळत नाहीत त्या दाखवण्याचा प्रयत्न केला. शरद पवारांच्या या लिंबू टिंबु पॉलिटिक्सचा भाग होता. त्यामुळे मराठा समाजातील लोकांना एकत्र आणून आरक्षण या विषयावर चर्चा करणार असल्याचे सदावर्ते यांनी यावेळी सांगितले.