कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील भाजप नेते तथा महाराष्ट्र भाजपचे प्रदेश सचिव ॲड. भरत पाटील यांनी नुकतीच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत संवाद साधता राज्यासह जिल्ह्यातील विविध विषयांवर चर्चा करत राज्यासह जिल्ह्यातील गड किल्ल्यांवर जे रोप वेचीमंजुरी देण्यात आली आहे. त्याबाबत जे नियम, अति घातलेल्या आहेत त्यांना शिथिलता आवी, अशी मागणी केली असल्याची माहिती ॲड. भरत पाटील यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना दिली.
ॲड. भरत पाटील यांनी आज ‘हॅलो महाराष्ट्र’शी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मंत्री गडकरी यांची नुकतीच भेट घेतली असून त्यांच्यासोबत ग्रामीण भागातील रस्ते तसेच राज्य, जिल्ह्यातील गड किल्ल्यांवर मंजुरी देण्यात आलेल्या रोप वेच्या कामासंदर्भात चर्चा केली. राज्यात रोप वे प्रकल्पासाठी लागणारे आणि आवश्यक परवाने व त्यामुळे रोप वे प्रकल्प उभारणीसाठी लागत असलेला वेळ या संदर्भात मंत्री गडकरी यांना सूचनांना करण्याची विनंती केली.
मंत्री गडकरी यांच्यासोबत झालेल्या चर्चेवेळी त्यांनी राज्य शासनाच्या संबंधित खात्यास तत्काळ सूचनांची कार्यवाही करण्याचे निर्देश देखील दिले. यापूर्वी देखील साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले तसेच भाजप आमदार शिवेंद्रसिहराजे भोसले यांनी जिल्ह्यातील प्रतापगड, सज्जनगड, अजिंक्यतारा या किल्ल्यावर रोप वे करण्याची मागणी केली असल्याची माहिती ॲड. भरत पाटील यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.
गड, किल्ल्यांवर रोप वे झाल्यास फायदा होईल
राज्यासह जिल्ह्यातील असे काही उंच किल्ले आहेत कि त्या ठिकाणी वयोवृद्ध रोकांना जाता येत नाही. तसेच उंच किल्ल्यांवर तरुण सहज जाऊ शकतात. मात्र, वयोवृद्ध लोकांना जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांच्या सोयीसाठी व वेळेच्या बचतीसाठी रोप वे हा पर्याय फायदेशीर ठरणार असल्याचे देखील ॲड. भरत पाटील यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना सांगितले.