प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी साॅफ्टवेअर खरेदीसाठी ZP कडून प्रशासकीय मान्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । आरोग्य यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे स्मार्ट करण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हा परिषदेच्या ठराव समिती सभेत ८४ केंद्रांसाठी साॅफ्टवेअर खरेदीच्या प्रशासकीय मान्यतेवर चर्चा पार पडली असून काही केंद्रातील दुरुस्ती, विस्तारीकरण आणि स्मार्ट केंद्र अनुषंगिक कामे करण्यासही मान्यता देण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या अध्यक्षतेखाली ठराव समितीची नुकतीच एक महत्वाची बैठक पार पडली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष हराळे, सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले, ग्रामपंचायतच्या अर्चना वाघमळे, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाच्या क्रांती बोराटे, महिला व बालविकास विभागाच्या रोहिणी ढवळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम आदीसह अधिकारी उपस्थित होते.

सभेत सुरूवातीला २९ जानेवारीला झालेल्या सभेचा कार्यवृत्तांत वाचून कायम करण्यात येऊन मागील ठरावावरील कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर पत्रिकेवरील विषयांना सुरुवात करण्यात आली. यामध्ये बांधकाम उत्तर विभागाकडील जिल्हा रस्ते विकास आणि मजबुतीकरणाच्या कमी दराच्या निविदास्वीकारण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर जिल्ह्यातील ८४ प्राथमिक आरोग्य केंद्रे स्मार्ट करण्यात येणार आहेत. यासाठी ८६ लाख रुपये खर्चाच्या साॅफ्टवेअर खरेदीसाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

तसेच कराड तालुक्यातील कोळे, पाटणमधील मुरुड आणि जावळी तालुक्यातील कुसुंबी प्राथमिक आरोग्य केंद्र स्मार्ट करण्यासाठीची अनुषंगिक कामे, प्रसुतीगृत, विस्तरीकरण, विद्यु तीकरण, रंगकाम, पार्किंग आदींबाबत चर्चा करण्यात आली. तर वाई तालुक्यातील भुईंज आरोग्य केंद्र दुरुस्तीबाबतही मान्यता देण्यात आली.