‘मिनी काश्मीर’मध्ये हुल्लडबाजांवर प्रशासनाचा राहणार ‘वॉच’; कारवाईसाठी विशेष पथकांची होणार नेमणूक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । पावसाळा जवळ आला की पर्यटकांची पाऊले आपोआप धबधबे, निसर्गरम्य ठिकाणांकडे वळतात. सातारा जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या कास, बामणोली, ठोसेघरसह महाबळेश्वर व पाचगणी परिसरात पावसाळ्यात पर्यटक मोठ्या प्रमाणात भेटी देतात. यामध्ये हुल्लडबाजी करणाऱ्यांचा देखील समावेश असतो. हुल्लडबाजांमुळे इतर पर्यटकांना मात्र, आनंद घेता येत नाही. याचा विचार करत जिल्हा प्रशासनाने आता पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्या अतिउत्साही हुल्लडबाजांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक भूमिका घेणार आहे. अशा पर्यटकांविरोधात मोहीम हाती घेताना त्यासाठी विशेष पथकेही नेमली जाणार आहेत.

सातारा जिल्ह्यात पावसाळ्यात पर्यटक साताऱ्यात येऊन निसर्गाचा आनंद घेतात. या पर्यटकांमध्ये काही हुल्लडबाज व अतिउत्साही पर्यटकांमुळे अनेक छोट्या मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. ज्यातून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. पावसाळ्यात उत्साही पर्यटकांवर रोख लावण्यासाठी आता जिल्हा प्रशासन कडक भूमिका घेत मोहीम हाती घेणार आहे.

यामध्ये प्रत्येक पर्यटन स्थळाच्या ठिकाणी अशा अतिउत्साही पर्यटकांवर वॉच ठेवला जाणार आहे. त्यासाठी महसूल व पोलिस यंत्रणेचा वापर केला जाणार आहे. यासाठी आतापासूनच प्रयत्न केले जाणार आहे. त्यामुळे थंड हवेच्या ठिकाणांबरोबरच पर्यटनस्थळी हुल्लडबाजीवर आता चाप बसणार आहे.