सर्व विभाग प्रमुखांनी मांढरदेव यात्रेच्या दरम्यान समन्वयाने काम करावे : राजेंद्रकुमार जाधव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | राज्यातील व राज्याबाहेरील भाविकांच्या श्रध्देचे स्थान असलेल्या सातारा जिल्हयातील वाई तालुकेतील मौजे मांढरदेव येथील श्री. क्षेत्र काळेश्वरी देवीची सन 2024 मधील यात्रा दिनांक 24, 25 व 26 जानेवारी,2024 मांढरदेव गड येथे पार पडणार आहे. सदर यात्रेच्या अनुषंगाने येणा-या भाविकांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध सेवा / सुविधा पुरविन्यात याव्यात, अशा सूचना वाईचे उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी दिल्या.

वाई येथे उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी दिनांक 09 जानेवारी,2024 रोजी सकाळी 11.00 वाजता मौजे मांढरदेव, ता. वाई, जि. सातारा येथे बैठक आयोजीत करणेत आली होती.
सदर बैठकीस बाळासाहेब भालचिम, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई, श्रीमती सोनाली मेटकरी, तहसिलदार वाई, सचिन पाटील तहसिलदार भोर, देविदास ताम्हाणे जिल्हा, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, सातारा, बाळासाहेब भरणे पोलीस निरिक्षक वाई, नारायण घोलप, गट विकास अधिकारी, पंचायत समिती वाई, किरणकुमर धनावडे, गट विकास अधिकारी, भोर तसेच वाई जिल्हा सातारा व भोर, जिल्हा पुणे तालुक्यामधील राज्य उत्पादन शुल्क, पोलीस विभाग, आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, उपप्रादेशिक परिवहन विभाग, अन्न व औषध प्रशासन, सहाय्यक कामगार, पशुसंवर्धन, दुरसंचार, जि.प.बांधकाम विभाग, सां.बा. बांधकाम विभाग, जीवन प्राधिकरण, नगरपालीका प्रशासन, विदयुत वितरण, ग्रामीण पाणी पुरवठा, वन विभाग, सिक्युरिटी फोर्स, तसेच सरंपच व सचिव मांढरदेव देवस्थान उपस्थित होते. उपस्थित सर्व अधिकारी यांना त्यांनी केलेल्या नियोजनाबाबत व त्यांचे अधिनस्त कार्यरत असलेल्या कर्मचारी यांना निश्चित करुन दिलेल्या व दयावयाच्या जबाबदार-या बाबत आढावा घेणेत आला. तसेच यापुढे करावयाच्या विविध कामाबाबत व निश्चित करावयाच्या जबाबदा-याबाबत संक्षिप्त स्वरुपात सूचना देऊन यात्रा कालावधी संपेपर्यत कोणत्याही विभागांच्या कार्यालय प्रमुखांकडून पार पाडावयाच्या जबाबदा-या व कामाबाबत हलगर्जीपणा करु नये तसेच सर्व काम यात्रेपूर्वी विहित मुदतीत पूर्ण केलेजातील याची दक्षता घ्यावी. तसेच जिल्हाधिकारी सातारा यांच्या अध्यक्षतेखाली यापुढील होणा-या बैठकीपूर्वी संबंधित सर्व विभागांचा आढावा घेतला जाणार असल्याने संबंधित विभागांना नेमून दिलेली कामे विहित मुदतीत पूर्ण करणेबाबतच्या सूचना सर्व विभाग प्रमुखांना देण्यात आल्या.

0000000