सातारा प्रतिनिधी | हिंदी आणि मराठी चित्रपटातील सुप्रसिध्द अभिनेते तथा दिग्दर्शक प्रविण तरडे (Pravin Vitthal Tarde) यांनी मंगळवारी जलमंदिर येथे खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी उदयनराजेंनी तरडे यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प भेट दिले.
यावेळी जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे माजी सभापती सुनिल काटकर, प्रतापगड संवर्धन समितीचे सदस्य काका धुमाळ, युवा नेते संग्राम बर्गे, प्रितम कळसकर, माधव सुर्वे, अॅड. अजयकुमार मोहिते व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी तरडे यांनी अनेक ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती केली आहे. तसेच इतिहासकालीन पुरुषांच्या भूमिकाही ताकदीने केल्या आहेत. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या अजरामर भूमिकेमुळे प्रविण तरडे हे विशेष चर्चेत आले होते. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी तरडे यांचे स्वागत केल्यानंतर त्यांच्या कामाचे विशेष कौतुक केले. यावेळी चित्रपट क्षेत्र तसेच सामाजिक विषयांवर चर्चा झाली. भविष्यात सकस भूमिका साकारुन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचे बळ तुम्हाला मिळो, अशा शुभेच्छा उदयनराजेंनी तरडे यांना दिल्या.