केंद्र सरकारच्या दुबळ्या धोरणांमुळे जवानांचे हौतात्म्य क्लेशदायक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोवई नाक्यावर गुरुवारी आंदोलन केले. ‘केंद्र सरकारचं करायचं काय, खाली मुंडी वर पाय’ अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या. यावेळी देशाच्या सीमेवर दहशतवादी हल्ल्यांमध्ये लष्करातील जवान हुतात्मा होण्यास केंद्र शासनाचे दुबळे धोरण कारणीभूत आहे. केंद्रीय गृह मंत्रालय याबाबत काय धोरण आखत आहे? दुबळ्या धोरणांचा फटका लष्करातील जवानांना बसत असल्याची टीका आंदोलकांनी केली.

या आंदोलनात जिल्हाप्रमुख सचिन मोहिते, सादिक बागवान, रूपेश वंजारी, प्रणव सावंत, सागर रायते, सुनील पवार, सचिन जगताप, शिवराज टोणपे, रवींद्र बंगे, हरी पवार, तानाजी चव्हाण, इम्रान बागवान, आरिफ शेख, अजित काळेल, आकाश धोंडे, अक्षय वाघमारे, आझाद शेख, अक्षय सावंत, राहुल ननावरे, प्रशांत इंगळे, किशोर साळुंखे, सुनील मोहिते, नीलेश चव्हाण, संदीप मोहिते सहभागी झाले होते.

यावेळी पोवई नाक्यावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. सचिन मोहिते म्हणाले, पाकिस्तानकडून दहशतवादाला चिथावणी दिली जात आहे.

पुलवामा प्रकरणात 400 किलो आरडीएक्स भारतात आणले गेल्याची माहिती गृह मंत्रालयाला नव्हती का? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दुबळी धोरणे जवानांच्या हौतात्म्याला कारणीभूत आहे. दरम्यान, पालकमंत्री शंभूराज देसाई हे एका कार्यक्रमासाठी पोवई नाक्यावरून जात असताना, आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली