सातारा जिल्ह्यातील ड्रग माफियांच्यावर कारवाई करा; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरात ड्रगची विक्री कॉलेज परिसरात होत असावी. बंटागोळीसारख्या अंमली पदार्थ साताऱ्यात पानटपऱ्यांवर मिळतात याकडे फुड अॅण्ड ड्रगचे लक्ष नाही. त्यांचे लाड बंद करा. गुटखा विक्रेत्यांची पाळेमुळे खणून काढा, अशा शब्दात फुड अॅण्ड ड्रगच्या अधिकाऱ्यांना शिवसेनेच्या ठाकरे गटाचे शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे यांनी प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला आहे. दरम्यान, दिवाळीच्या सणापूर्वी शहरात भेसळयुक्त पदार्थ विक्री होण्याची शक्यता आहे. यावर कार्यवाही होणे उचित आहे, अशीही विनंती करण्यात आली.

यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे, शहर संघटक प्रणव सावंत, सागर धोत्रे, शिवाजीराव इंगवले, गणेश अहिवळे, अमोल गोसावी, सादिक बागवान, आझाद शेख, रवींद्र भणगे, शिवेंद्र ताटे, सौ. मंजिरी सावंत, सुमित नाईक. सनील भोसले संतोष निगड़कर नितीन लकेरी विनायक शिंदे योगेश शेलार, ऋषिकेश साठे, सिद्धार्थ कांबळे, रजत नाईक, आशुतोष पारंगे, राजू नाईक, हेमंत उबाळे, सागर साळुंखे, सचिन शिंदे, राहुल जाधव, अनिल काशिद, संग्राम कांबळे, नागेश गवळी, सुनील यादव आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे, लोकसंख्या वेगाने वाढत आहे. दिवसेंदिवस सुशिक्षीत बेकारांची त्या प्रमाणात संख्या वाढत आहे. या सर्वांचा विचार केल्यास आजची तरुणाई कमी वेळेत कमी कष्टाने वाम मार्गाचा अवलंब करुन पैसे मिळवण्याच्या दृष्टीने गंभीर प्रकारचे गुन्हे करत आहेत. त्यातूनच ड्रग्स, गुटखा, दारु आदीसारखे नशिली पदार्थाणी विक्री उघडपणे किवा लपून करत आहेत. आज रोजी महाराष्ट्रात जे पदार्थ विक्री करण्यास मनाई आहे. ज्यावर शासनाने बंदी घातली आहे. असे पदार्थ पानटपरी, हॉटेल, किराणा मालाच्या दुकानात सहजपणे विक्री होत आहेत.

सक्तीचे धोरण अवलंबून विनापरवाना आणि अवैद्यरित्या विक्री करणाऱ्यावर कारवाई करून सातारा जिल्हा ड्रग मुक्त करावा, तसेच दिवाळीमुळे बऱ्याच हॉटेल्स, तसेच बेकरीच्या, मिठाईच्या दुकानात फराळाचे साहित्य तयार करुन पॅकेटची खुली विक्री केली जाते. सणासुदीच्या दिवसात खवा, मावा तसेच मिठाई खाद्यतेल, वनस्पती तुप, अन्नपदार्थांना मोठी मागणी असते. त्यामुळे त्यामध्ये भेसळ होण्याची शक्यता असते. त्या पदार्थाची गुणवत्ता व वापरलेल्या साहित्याची चाचणी सक्तीने करावी, या काळात बऱ्याचदा पदार्थ तयार करण्यासाठी भेसळ केली जाते. लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आपण विविध दुकानांची तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.