सातारासह कराड दक्षिणेतील 3 मोठ्या पक्षांतील कार्यकर्त्यांचा ‘उबाठा’ शिवसेनेत प्रवेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सातारा आणि दक्षिण कराडमध्ये आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्षांकडून कार्यकर्त्याची मोर्चे बांधणी केली जात आहे. अशात आता सातारासह कराड दक्षिणेत भाजपसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडले आहे. कारण या 3 मोठ्या पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला आहे.

शिवसेना नेते तथा खासदार अनिल देसाई यांनी शिवबंधन बांधून या सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी शिवसेना उपनेते नितीन बानुगडे-पाटील, सातारा जिल्हाप्रमुख हर्षल कदम, माजी नगरसेवक इंद्रजित गुजर यांची उपस्थिती होती.

या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिह्यातील जय सूर्यवंशी, आयुब कागदी, सुधीर कशिद, राकेश पवार, वनिता मोरे, जयवर्धन देशमुख, अजित पवार, विशाल कदम, कामिल बागवान, महेश गायकवाड, सागर धुमाळ, राज कांबळे, नदीम पालकर, भक्ती मोरे, किरण थोरात, निशा पवार, विद्या चोरगे आदी कार्यकर्त्यांनी ‘उबाठा’ शिवसेनेत प्रवेश केला आहे.