कराड प्रतिनिधी | सातारा तालुक्यातील नागठाणे येथील साहिल शिकलगार व त्याच्या टोळीतील त्याच्या साथीदाराने एक व्यक्तीला मारहाण केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी साहिल शिकलगार याच्यासह त्याच्या 3 साथीदारांना अटक केली असून मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.
१) साहिल रुस्तुम शिकलगार रा. नागठाणे, ता. जि. सातारा, २) भरत संजय मोहिते रा. नागठाणे, ता. जि. सातारा, ३) अमित ऊर्फ कन्हैयया सुनिल साळुंखे रा. नागठाणे, ता. जि. सातारा, ४) आशिष बन्सीराम साळुंखे रा. नागठाणे, ता.जि.सातारा अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या टोळीतील आरोपींची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, व अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी सातारा जिल्ह्यातील गुन्हेगारांविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अन्वये प्रभावी कारवाई करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांना सूचना दिलेल्या होत्या.
या दरम्यान बोरगाव पोलीस ठाण्यात साहिल शिकलगार याच्यासह त्याच्या ३ साथीदारांवर गुन्हा रजि. नंबर ०६ / २०२३ भा.द.वि.स. कलम ३९४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्यातील आरोपी साहिल रुस्तुम शिकलगार व अमित ऊर्फ कन्हैय्या सुनिल साळुंखे रा. नागठाणे यांनी त्यांचे साथीदारांच्या मदतीने फिर्यादीला कोयत्याने, पटयाने हाताने व लाथाबुक्याने तोंडावर, पाठीवर व अंगावर मारहाण करुन २५ रहजार रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली होती. पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या सूचनांनुसार पोलीस निरीक्षक रविंद्र तेलतुंबडे बोरगाव पोलीस ठाणे यांनी नमुद टोळी विरुध्द दाखल असले गुन्ह्यांची माहिती संकलित केली.
तसेच १) साहिल रुस्तुम शिकलगार रा. नागठाणे, ता.जि.सातारा २) भरत संजय मोहिते रा. नागठाणे, ता. जि. सातारा ३) अमित ऊर्फ कन्हैयया सुनिल साळुंखे रा. नागठाणे, ता. जि. सातारा ४) आशिष बन्सीराम साळुंखे रा. नागठाणे, ता.जि.सातारा यांना ताब्यात घेतली. त्यांच्याबाबत माहिती घेतल्यानंतर हिंसाचाराची धमकी देणे, खुनाचा प्रयत्न, अपहरण, दरोडा, जबरी चोरी, जबरी चोरी करताना दुखापत करणे, जबर दुखापत, विनयभंग, घरफोडी, चोरी, कायदेशीर अटकेला प्रतिकार किंवा अटकाव करणे, विनापरवाना अग्निशस्त्र बाळगणे अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींचेविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये (मोक्का) कारवाई करीता पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्फतीने विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापुर यांच्याकडे मोक्का अंतर्गत प्रस्ताव सादर केला.
विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलार यांनी सदर टोळीविरुध्द दाखल असलेल्या गुन्ह्यांचे कागदपत्रांचे अवलोकन करुन मोक्का प्रस्तावाची पडताळणी केली. सदर गुन्हयास मोक्का कायदयान्वयेची वाढ करून कलम व परवानगी देऊन गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी यांच्याकडे देण्यात आला आहे.
मोक्का प्रस्ताव मंजुरी करीता सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी, किरणकुमार सुर्यवंशी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहा. पोलीस निरीक्षक रविंद्र तेलतुंबडे तसेच पो.ना. अमित सपकाळ, सहा. पोलीस फौजदार भोसले पो. हवा. प्रविण शिंदे, दबडे पाटील, पो.ना. विशाल जाधव, बाळासाहेब जानकर, दादा स्वामी, नेम बोरगावा पोलीस ठाणे या पोलीस अंमलदारांनी मोक्का कारवाईकरीता सहभाग घेतला आहे.
9 महिन्यात 7 मोक्का प्रस्तावामध्ये 105 जणांविरुध्द मोक्का
नोव्हेंबर २०२२ पासून ०७ मोक्का प्रस्तावामध्ये १०५ इसमांविरुध्द मोक्का कायदयाअंतर्गत कारवाई केली आहे. तसेच १९ इसमांविरुध्द हद्दपारीसारखी व ०१ इसमास MPDA कायदयान्वये स्थानबध्द करणेत आले आहे. तसेच भविष्यातही सातारा जिल्ह्यामधील सराईत गुन्हेगारांचे विरुध्द मोक्का, हद्दपारी, MPDA अशा प्रकारच्या कठोर कारवाया केल्या जाणार आहेत.