सातारा प्रतिनिधी | पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी रोज नवीन खुलासे होत आहे. अशातच आता अल्पवयीन मुलाच्या बापाला मोठा धक्का बसला आहे. सातारा जिल्हा प्रशासनाने महाबळेश्वर येथील विशाल अग्रवाल याच्या MPG क्लब मधील अखेर गुरुवारी रात्री बार सील करण्यात आला. हा बार अनधिकृत असल्याचं समोर आल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे हा अग्रवाल कुटुंबीयांना मोठा धक्का मानला जात आहे.
महाबळेश्वरमध्ये सुरेद्रकुमार अग्रवाल यांच्या नावाने महाबळेश्वर पारसी जिमखान्यामध्ये क्लब आणि रिसॉर्ट आहे. या क्लबबद्दल अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने चौकशी केली. यावेळी अनेक त्रुटी समोर आल्या होत्या. त्यानंतर सातारा जिल्हाधिकारी यांच्या आदेशानं MPG क्लबचा बार अखेर सील करण्यात आला आहे. अग्रवाल याचं अनाधिकृत हॉटेल असल्याच्या तक्रारीनंतर हा बार सील करण्यात आला आहे.
पालिकेत झाल्या होत्या तक्रार दाखल…
महाबळेश्वरमध्ये अग्रवाल यांनी शासकीय मिळकत भाड्यानं घेवून या ठिकाणी फाईव्हस्टार दर्जाचं पंचातारांकित हॉटेल बांधलं आहे. हे बांधकाम बेकायदेशीर असून शासनाच्या नियमांना धाब्यावर बसवून हे हॉटेल उभारण्यात आल्याचं निदर्शनात येत आहे. या बाबत महाबळेश्वर नगरपालिकेत तक्रारी दाखल करण्यात आली असून यावर अजूनही कारवाई झाली नाही.
मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले होते आदेश
गुरूवारी माध्यमांशी संवाद साधत महाबळेश्वर मधील हॉटेलप्रकरणी मुख्यमंत्री शिंदे यांनी थेट कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पुणे अपघात प्रकरणातील आरोपी अग्रवाल याच्या कुटुंबाने जर सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून त्या ठिकाणी पंचतारांकित हॉटेल बांधलं असेल तर त्यावर बुलडोझर फिरवावा. अशा कारवाईच्या सूचना पोलीस, पालिका प्रशासनास दिल्या आहेत.
पालिकेकडे झाली होती मागणी
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरवर मधील एक शासकीय जागा भाडेतत्वावर घेऊन त्या ठिकाणी विशाल अग्रवाल यांनी पंचतारांकित हॉटेल सुरू ठेवले आहे. एमपीजी क्लब हे विशाल अग्रवाल यांचे हॉटेल असून सरकारी जागेवर हे हॉटेल बांधलं आहे अनाई ते भाडेतत्वावर दिले आहे. या याठिकाणी सुरू असलेल्या बार विरोधात महाबळेश्वर पालिकेकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. इतकेच नाही तर महाबळेश्वरपालिकेचे मुख्याधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांकडे सुद्धा बार बंद करण्याची आणि हाॅटेल सील करण्याची मागणी करण्यात आली आहे
नेमकं रिसॉर्ट प्रकरण काय?
महाबळेश्वर येथे पारशी जिमखाना नावाचे क्लब, एक ट्रस्ट होती. या ट्रस्टच्या मालकीची हि पंचतारांकित असलेल्या हॉटेलची मिळकत आहे. २०२० साली विशाल अग्रवाल आणि त्यांच्या कुटुंबीयांनी हि मिळकत त्याच्या नावर केली. ट्रस्टची जागा त्यांच्या नावावर कशी झाली? ट्रस्टला क्लबची परवानगी होती. या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात रिसॉर्ट सुरु करण्यात आले असून ते अग्रवाल यांनी दुसऱ्याला भाडेतत्वावर दिलेले आहे.