राज्य उत्पादन शुल्कची पाल गावच्या हद्दीत अवैध दारु वाहतूकीवर कारवाई; दुचाकी, दारुसह मुद्देमाल हस्तगत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने अवैध दारु विक्री व वाहतूकीवर कराड तालुक्यातील पाल गावच्या हद्दीत काशीळ – पाल रोडवर बेकायदेशीर देशी दारूची वाहतूकीवर कारवाई करत एकास अटक केली. देशी दारू व ताडीचा एकुण ११ हजार ५५० रुपये किंमतीचा मुद्येमाल तसेच वाहनासह एकुण ५६ हजार ५५० रुपये किंमतीचा मु्द्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सुनिल रमेश यादव (वय २४, रा. इंदिरानगर, उंब्रज ता. कराड जि.सातारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क उपायुक्त डॉ.विजय सुर्यवंशी, प्रसाद सुर्वे, विभागीय उपयुक्त विजय चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आचार संहितेच्या पाश्वभूमीवर अवैध दारु विक्री व वाहतूकीवर गस्त घालत असताना अधीक्षक रविद्र आवळे यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथकाने कराड तालुक्यातील पाल गावच्या हद्दीत काशीळ – पाल रोडवर बेकायदेशीर देशी दारूची वाहतूकीवर कारवाई करत एकास अटक केली. सुनिल रमेश यादव (वय २४, रा. इंदिरानगर, उंब्रज ता. कराड जि.सातारा) या इसमांविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६५(अ) (ई) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

सदर इसमांच्या ताब्यातून देशी दारू व ताडीचा एकुण ११ हजार ५५० रुपये किंमतीचा मुद्येमाल तसेच एक हॉंडा कंपनीची AVIATOR मॉडेल असलेली दूचाकी जप्त करण्यात आली आहे. सदर गुन्हयात वाहनासह एकुण ५६ हजार ५५० रुपये किंमतीचा मु्द्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढ़ील तपास श्री.सोमनाथमाने, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सातारा है करीत आहेत.

विधानसभा सावंत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने सातारा जिल्हयामध्ये बेकायदा हातभट्टीदारु निर्मिती, विक्री, वाहतूक तसेच इतर कोणत्याही प्रकारच्या दारुची बेकायदेशीर निर्मिती, विक्री ववाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याची माहिती या कार्यालयाच्या १८००२३३९९९९ या टोल प्रीक्रमांकावर देण्यात यावी असे आवाहन अधीक्षक श्री. रविंद्र आवळे यांनी केले आहे.