सातारा प्रतिनिधी । सातारा शहरात वाढत असलेल्या अतिक्रमणाविरोधात पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कारवाई सुरु करण्यात आली आहे. दरम्यान, सोमवारी शहरातील आरटीओ चौकातील अतिक्रमणांवर सार्वजनिक बांधकाम विभागाने कारवाई करीत 3 बांधकामे जमीनदोस्त केली.
सातारा शहरात पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेविले पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. साताच्यातील आरटीओ ऑफिसशेजारी जिल्ह्यातून तसेच बाहेरील लोकांचाही राबता असल्याने याठिकाणी मोक्याची जागा हेरून काही जणांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेच आपली दुकाने थाटली होती. याठिकाणी एक चहा-नाष्ट्याचे हॉटेल, कुशन वर्क्स आणि चायनीजची टपरी टाकण्यात आली होती. ही दुकाने थाटताना येथील ओढ्याचेही गटार करायला कर्मचाऱ्यांनी मागेपुढे पाहिले नाही.
हजारो रुपये प्रतिमहिना या नियमाने हे लोक भाडे काहीजणांना देत होते. गेल्या काही महिन्यांमध्ये बांधकाम विभागाने या अतिक्रमणांविरोधात अतिक्रमणधारकांना नोटीसी काढल्या. आणि अखेर आज सकाळपासून सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता व पालिका कर्मचारी पोलीस यंत्रणेला बरोबर घेत याठिकाणी दाखल झाले. यावेळी अधिकारी व अतिक्रमणधारकांमध्ये शाब्दिक चकमक झाली. मात्र, अतिक्रमण काढण्याच्याच मानसिकतेने आलेल्यापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या अतिक्रमणांवर कडक कारवाई केली.