जिह्यातील 27 महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र (ACKVK) योजनेस मान्यता प्राप्त झाली आहे. योजनेमध्ये सातारा जिल्हयातील २७ महाविद्यालयांमध्ये “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे (ACKVK) उद्घाटन दि. २० सप्टेंबर २०२४ रोजी दुरदृष्य प्रणालीद्वारे दुपारी १२.३० वाजल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्च्यूअल/ ऑनलाईन पध्दतीने करण्याचे करण्यात येणार आहे.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० अंमलबजावणीला सकारात्मक वातावरण निर्मिती होण्यासाठी तसेच युवक युवतींना कौशल्य विकासाची संधी महाविद्यालयामध्ये उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मार्फत केंद्र, राज्य व जिल्हा पुरस्कृत विविध कौशल्य विकास प्रशिक्षण योजनांच्या माध्यमातून राज्यातील १५ ते ४५ वयोगटातील युवक-युवतींना विविध ३७ क्षेत्रामध्ये (बँकिंग, माहिती तंत्रज्ञान, बांधकाम, ईलेक्ट्रॉनिक्स, रिटेल, वित्त् इ.) कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम बनवून रोजगार अथवा स्वयंरोजगाराच्या संधी पुरविण्यात येतील तसेच या योजनेच्या धर्तीवर राज्यातील नामांकित महाविद्यालयामध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात येत आहे.

सातारा जिल्हयातील २७ आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे स्थापन करण्यात येणार आहे. यांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. तरी सर्वानी उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहायक आयुक्त सुनील पवार यांनी केले आहे.