हैद्राबाद, कर्जतमध्ये 33 लाखांच्या 3 ट्रकची विक्री करणाऱ्या आरोपीला वाई पोलिसांकडून अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | फसवणुक करुन परस्पररीतीने सुमारे 33 लाख 10 हजार रुपये किंमतीचे 3 ट्रकची विक्री करणाऱ्या आरोपीला वाई पोलिसांनी अटक केली आहे. हैद्राबाद, कर्जत/ जामखेड, खुलताबाद (औरंगाबाद) येथुन आरोपीसह ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. अब्दुल कादीर मोहम्मद अली सय्यद (वय 51) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वाई पोलीस ठाण्यात फसवणूक करून वाहन विक्री करणाऱ्या गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी अब्दुल कादीर मोहम्मद अली सय्यद (वय ५१, मुळ रा सुपा ता पारनेर जि अहमदनगर सध्या रा २४/अ गल्ली नं २४ महंम्मदवाडी रोड सय्यदनगर, हडपसर, पुणे) हा अनेक दिवसांपासून फरारी होता. सदर आरोपी हा हडपसर येथे येणार असल्याची माहिती पोलीस ठाणेचे परि. सहा पोलीस अधिक्षक कमलेश मीना यांस प्राप्त झाली. त्यांनी वाई पोलीस ठाणेचे तपास पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, पो.हवा भोईर, पो. शि १२५५ राठोड, पो.शि ७९७, पो.शि प्रेमजीत शिर्के यांस सदर आरोपीस अटक करण्याचे आदेश दिले. वाई डीबी पथकाने
हडपसर येथे दि. २५/०८/२०२३ रोजी सापळा रचुन आरोपी अब्दुल कादिर मोहम्मद सय्यद यांस ताब्यात घेतले.

तसेच त्याचेकडे सदर गुन्हयाचे अनुशंगाने सखोल चौकशी करण्यात आली. यावेळी त्याने आयशर क्र (एमएच ११ एएल ४९६६) हे वाहन हैद्राबाद येथे विकल्याचे सांगितले. तसेच टाटा टिपर क्र (एमएच १२ पीक्यु ४२२०) हा कर्जत/जामखेड अहमदनगर येथे व डंम्पर वाहन क्र (एमएच ११ सीएच ५१९१) हा धुळे, खुल्ताबाद, संभाजीनगर येथे विकल्याचे सांगितले. सदर आरोपीवर यापूर्वी महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्र बाहेर अशाच फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. सदरबाबत वाई पोलिस ठाणेचे प्रभारी अधिकारी मा. सहा पोलीस अधिक्षक सो कमलेश मीना यांनी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांस फसवणुक करून परस्पर विकलेले ट्रक जप्त करण्याचे आदेश दिले.

तपास पथकाने सदर गुन्हयाचे तपासात तांत्रीक विश्लेषण करुन, तपासकामी रवाना होऊन त्यांनी आयशर ट्रक क्र (एमएच ११ एएल ४९६६) हा दि. २७/०८/२०२३ रोजी हैद्राबाद येथील बेगमपुरा पोलिस ठाणेचे हदी मधुन मौला अली या व्यक्ती कडुन सापळा रचुन ताब्यात घेतला. तसेच दि. २९/०८/२०२३ रोजी डंम्पर क्र (एमएच १२ पीक्यु ४२२०) हा कर्जत, जिल्हा अहमदनगर येथील रेहकुरी गावाचे हद्दीमधुन सापळा रचुन ताब्यात घेण्यात आला व दि. ३०/०८/२०२३ रोजी डंम्पर वाहन क्र (एमएच
११ सीएच ५१९१) हे वाहन संभाजीनगर मधील खुल्ताबाद पोलीस ठाणेचे हद्दी मधील पिंपळगांव घनसावंगी या गावातुन सापळा रचुन जप्त करुन ताब्यात घेण्यात आले. असा एकुण सदर गुन्हयातील ३ ट्रक डंम्पर (३३ लाख १० हजार रु.) किंमतीचे जप्त करण्यात आलेले आहेत.

सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक सो श्री. समिर शेख, मा. अप्पर पोलीस अधीक्षक सो श्री. बापु बांगर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो वाई विभाग श्री. बाळासाहेब भालचिम यांचे मार्गदर्शनाखाली वाई पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री. कमलेश मीना परि. सहा. पोलीस अधीक्षक, पोलीस उप निरीक्षक श्री. सुधिर वाळुंज, श्री. बिपीन चव्हाण, पोलीस हवालदार राहुल भोईर, पोलीस अंमलदार हेमंत शिंदे, श्रावण राठोड, नितीन कदम, प्रेमजीत शिर्के यांनी केली आहे.