कराड प्रतिनिधी । कराडसह सांगली, शिराळा आणि इस्लामपूर येथे अनेक गुन्हे करून तब्बल ९ वर्षे एक आरोपी फरार होता. त्यास कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाकडून अटक करण्यात आली. दिपक महादेव थोरात (मुळ गांव वाकुडे बुद्रुक ता. शिराळा जि. सांगली हल्ली रा. राम मंदिरा समोर, करवडी ता. कराड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सातारा जिल्हा पोलीस दलाचे अभिलेखावरील फरारी व पाहिजे आरोपीचा शोध घेऊन त्यांच्याबाबत पुढील कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांनी पोलीसांना दिले होते. कराड शहर पोलीस ठाणे हद्दीत सिध्दीपार्क 3, साई गार्डनमागे विद्यानगर, संदापुर कराड येथील श्री. संजय तुकाराम देसाई यांच्या घरात दि. 5 रोजी ते दि. 6 सप्टेंबर 2015 रोजी कालावधीत दोन अज्ञात व्यक्तीनी घरातील मोबाईल फोन मुद्दाम लबाडीने चोरुन नेला होता.
त्यांच्या फिर्यादीवरुन कराड शहर पोलीस ठाणे, गु. र. नं. 406/ 2015 भादंविसं. क. 380, 34 चा दाखल झालेला होता. सदर गुन्ह्यामध्ये आरोपी (1) आनंदा भिकाजी थोरात (रा. वाकुर्डे, ता. शिराळा जि. सांगली व (2) दिपक महादेव थोरात (मुळ गांव वाकुडे बुद्रुक ता. शिराळा जि. सांगली हल्ली रा. राम मंदिरा समोर, करवडी ता. कराड) यांचे विरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. दरम्यान, सदर गुन्ह्यात आरोपीत दिपक महादेव थोरात हा गुन्हा केल्यापासून सुमारे 9 वर्षे आपले अस्तित्व लपवुन पोलीसांचे नजरेआड राहुन पोलीसांना गुंगारा देत होता.
सदर गुन्ह्याचा तत्कालीन सहा. पो. फौजदार एस. आर. जाधव यांनी तपास करुन आरोपी दीपक थोरात व यातील अटक आरोपी आनंदा थोरात यांना फरारी दाखवुन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलेले होते. सदरचा गुन्ह्यातील फरारी झाले आरोपीत यांचा शोध घेवुन त्यांना सत्वर जेरबंद करण्याच्या सुचना वरीष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांनी डी. बी. टीमला दिल्या होत्या. त्याप्रमाणे फरारी आरोपीची गोपनीय बातमी दारांकडुन मिळवली.
तसेच तपासचक्र फिरवत कसोशीने माहीतीच्या आधारे घरफोडी चोरीच्या गुन्ह्यातील फरारी आरोपीत दिपक महादेव थोरात मुळ रा. वाकुर्ड ता. शिराळा हा कराड परीसरात आल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील व डीबी टीमला कारवाई करणेच्या सुचना केल्या. त्याप्रमाणे शोध करीत असताना पोलीस अंमलदार आनंदा जाधव यांनी पाठलाग करुन त्यांस शिताफीने ताब्यात घेतले. त्यांचेकडे सखोल चौकशी केल्यावर त्याने गुन्हा केलेची कबुली दिली असुन त्यांस अटक करणेत कराड शहर डी. बी. पथकाने यश मिळविलेले आहे. पुढील कार्यवाही सहा. पोलीस उपनिरीक्षक संजय देवकुळे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षकआंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड अमोल ठाकुर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक पतंग पाटील, कराड शहर पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार, स. फौ. रघुवीर देसाई, स. फौ. संजय देवकुळे, पोलीस अंमलदार विकास सपकाळ, शशिकांत काळे, अमित पवार, कुलदिप कोळी, संतोष पाडळे, आनंदा जाधव, महेश शिंदे, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, सोनाली पिसाळ यांनी केलेली आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पो. अधीक्षक आंचल दलाल यांनी कराड शहर पोलीसांचे अभिनंदन केले आहे.