डंपर सोडविण्यासाठी 55 हजाराची लाच घेताना महसूल सहाय्यकाला रंगेहाथ पकडले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | जप्त केलेले दोन डंपर सोडवण्यासाठी 55 हजार रुपयांची मागणी करून ती घेत असताना महसूल सहाय्यका रंगेहाथ पकडल्याने घटना वडूज तहसील कार्यालयात आज बुधवारी घडली. सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली असून या कारवाईमुळे खटाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

प्रविण धर्मराज नांगरे, (वय 42, रा. मौजे तडवळे, ता. खटाव. जि. सातारा). महसूल सहाय्यक, वडूज तहसिल कार्यालय असे आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांचे मालकीचे दोन डंपर असून त्यांच्याकडून बिल्डिंग मटेरियल सप्लायचा व्यवसाय केले जातात. यातील तक्रारदार यांचे दोन्ही डंपर दि. 16 नोव्हेंबर रोजी क्रश सॅण्ड व क्रश खडी भरून वाहतूक करीत असताना तहसिलदार खटाव यांनी तक्रारदार यांचे दोन्ही डंपर जप्त केले होते.

सदरचे दोन्ही डंपर सोडविण्यासाठी तहसिल कार्यालय खटाव येथील लोकसेवक प्रविण धर्मराज नांगरे, (वय 42 , रा. मौजे तडवळे, ता. खटाव. जि. सातारा) यांनी स्वतःसाठी तक्रारदार यांना डंपर सोडविण्याकरीता 55 हजार रुपये लाच मागणी केली. तसेच ती लाचेची रक्कम स्विकारल्यावर लोकसेवक नांगरे यांना एलसीबी पठकाने ताब्यात घेतले.

वडूज तहसील कार्यालयात आज केलेली सदरची कारवाई अतिरिक्त कार्यभार, पोलीस उपअधीक्षक पोलीस निरीक्षक सचिन राऊत, पोलीस निरीक्षक विक्रम पवार, पो. हवा. नितीन गोगावले, पो.ना. गणेश ताटे, पो. ना. निलेश राजपुरे, म. पो. ना. प्रियांका जाधव, पो. कॉ. निलेश येवले, पो. कॉ. तुषार भोसले, म. पो. कॉ. शितल सपकाळ यांच्या वतीने करण्यात आली.