कराड दक्षिणमध्येच मतदार यादीवर तब्बल 4 हजारांवर हरकती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | निवडणूक विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार यादीवर हरकती घेण्यासाठी ऑनलाइन व ऑफलाइन प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्याअंतर्गत कराड दक्षिण मतदारसंघातून सर्वाधिक हरकती घेण्यात आल्या होत्या. या हरकतींवर आजपासून उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, तहसीलदार कल्पना ढवळे, तहसीलदार श्रीमती संदे यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली.

या वेळी निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार हेमंत बेसके, युवराज पाटील, शिवराज माळी, मंडल अधिकारी, तलाठी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. मतदार यादीवरील दुबार नावे, स्थलांतरित नावे यांच्यावर आक्षेप घेण्यासाठी निवडणूक आयोगाकडून ऑनलाइन व ऑफलाइन प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्याअंतर्गत कऱ्हाड दक्षिण मतदारसंघात सर्वाधिक चार हजारांवर हरकती घेण्यात आल्या होत्या. त्याची सुनावणी प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी आजपासून लावली होती.

प्रांताधिकारी म्हेत्रे यांना प्रशिक्षणासाठी जावे लागल्याने कऱ्हाड दक्षिणमधील हरकतींची सुनावणी उपजिल्हाधिकारी पाटील, तहसीलदार ढवळे, जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार श्रीमती संदे यांच्या उपस्थितीत आज सुरू करण्यात आली. त्यामध्ये ज्यांच्या नावावर आक्षेप घेण्यात आला होता. त्यांची पुरावे व अन्य माहितीची खातरजमा करण्यात आली. मात्र, या सुनावणीसाठी काही जण अनुपस्थित राहिले. ज्यांची कागदोपत्री शहानिशा करण्यात आली. त्यांची पुढील कार्यवाही निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार करण्यात येणार आहे.