‘अजितदादांना अटक करा अन् देवेंद्र फडणवीसांचा कान…’; अभिजीत बिचुकलेंनी लिहलं थेट मोदींना पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । यंदाच्या विधानसभा निवडणुकीत संपू्र्ण महाराष्ट्रासह देशाचं लक्ष असेल ते बारामतीकडे मतदार संघाकडे. कारण या ठिकाणी विधानसभेला काका-पुतण्या असा सामना रंगणार आहे. या मतदार संघात आता बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) यांनी एंट्री केली आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर बिचुकले यांनी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पत्र लिहले आहे. बिचुकले यांनी पुन्हा एकदा अजित पवारांवर निशाणा साधला आहे. सिंचन घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अटक करा, कारवाई करायची नसेल तर देवेंद्र फडणवीस यांचा कान धरा आणि अजित पवरांसह राज्यातील जनतेची माफी मागायला लावा.’, असं मोदींना लिहिलेल्या पत्रात बिचुकलेंनी म्हटले आहे.

अभिजीत बिचुकले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यासंदर्भात एक पत्र लिहिले आहे. कारवाई करा अन्यथा अजित पवारांची माफी मागा, अशी मागणी अभिजीत बिचुकले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. ‘तुम्ही सज्जन पंतप्रधान जर असाल तर अजित पवार यांच्यावर कठोर कारवाई करा. जोपर्यंत मी विधानसभेचा उमेदवार आहे आणि माझं निवडणुकीचं चिन्ह घोषित व्हायच्या आत ही कारवाई करा. अजित पवार यांच्यावर कारवाई करायची नसेल तर देवेंद्र फडणवीस यांचा कान धरा आणि अजित पावरांसह राज्यातील जनतेची माफी मागायला लावा.’, असं बिचुकलेंनी पत्रात म्हटले आहे.

तर अजित पवारांना सिंचन घोटाळा प्रकरणी ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार केला, असा आरोप १९९१ सालापासून विधानभवनात असलेल्या अजित पवारांवर केला जातो, आता सत्तेत आल्यानंतर अजित पवार यांना अर्थ खाते देण्यात आले आहे. यासह त्यांना अर्थमंत्री पद दिलं जातं. त्यामुळे ही जनतेच्या मतांची कुचेष्ठा नाही का? असा सवालच अभिजीत बिचुकले यांनी केला आहे.

2014 च्या निवडणुकीत भाजप नेते देंवेद्र फडणवीस यांनी सत्तेवर आल्यावर सिंचन घोटाळाप्रकरणी अजित पवार यांना चक्की पिसायला लावू असे वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांनी पवार यांच्यासोबत पहाटेच शपत घेतली. सिंचन घोटाळ्यात अजित पवार दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई करा, नसतील तर तसे जाहीर करून त्यांची माफी मागा, अशी मागणी अभिजित बिचुकले यांनी अर्ज दाखल केल्यावर माध्यमांशी बोलताना केली. बारामती शहर खूप सुंदर आहे. मला इथल्या जनतेने संधी दिली तर शरद पवारांपेक्षा चौपट विकास करून दाखवेन, असे ते बिचुकले यांनी अर्ज दाखल केला त्यावेळी म्हटलं आहे.