Abhijit Bichukle : बिग बॉस फेम अभिजित बिचुकले सातारा लोकसभेची निवडणूक लढणार…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. एकीकडे उदयनराजेंची उमेदवारीसाठी पळापळ सुरु असताना दुसरीकडे महायुतीत अजित पवार गटाने देखील सातारा लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. या दरम्यान, आता बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukle) यांनी मी सातारा लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे सांगत उदयनराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला आहे. “उदयनराजे यांना दुसऱ्या पक्षात जायची काय गरज?त्यांना दिल्लीत जावं लागत हे दुर्देवी, महायुतीच्याया नेत्यांनी जागा वाटपासाठी माझ्याकडे यावं मी तिढा सोडवतो” असे बिचुकले यांनी म्हटले आहे.

अभिजित बिचुकले यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “ज्या भाजपवाल्यानी जय भवानी, जय शिवाजीला विरोध केला त्या भाजप सोबत उदयन राजे का गेले?, अजित पवारांना केवळ 2-3 जागा मिळतात. अमित शाह गुजराती उद्योजक आहेत, सगळे त्यांचे चाकर झाले आहेत.

उदयनराजे माझे बंधू होते, आहेत आणि राहणार. मी अनेक निवडणुका त्यांच्या विरोधात लढल्या. पण आम्ही आजही चांगले मित्र आहोत. छत्रपती हे छत्रपती आहेत, ते इकडे तिकडे फिरताहेत हे मला पटत नाही. राज्याला नवी दशा आणि दिशा मी देणार” असा दावा बिचुकले यांनी केला आहे.