‘लोकसभे’च्या आखाड्यात अभिजित बिचुकलेंनी थोपटले दंड; भरला उमेदवारी अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभेच्या निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांसह वाजतगाजत उदयनराजे भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज नुकताच दाखल केला आहे. त्यानंतर आता शशिकांत शिंदे आणि उदयनराजे भोसले या दोघांच्या विरोधात ‘बिग बॉस’ फेम अभिजित बिचुकले यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणुकीच्या आखाड्यात दंड थोपटले आहेत.

सातारा लोकसभा मतदारसंघात उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आज शुक्रवारी तब्बल 12 उमेदवारांनी अर्ज दाखल झाले. यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील तसेच अभिजित बिचुकले यांचा समावेश आहे. अभिजित बिचुकले यांनी जेव्हा निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती तेच त्यांनी आपण खासदार झाल्यास अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारकासाठी पाठपुरावा करणार आहेत.

त्यामुळे छत्रपतींचा वैचारिक वारस म्हणून जनतेने मला मतदान करावे, असे आवाहन केले होते. त्यानंतर आता बीचुकले यांनी स्वतः आपल्या उमेदवारीचा अर्ज भरला आहे. अभिजित बिचुकले यांनी यापूर्वी 2004, 2009, 2014, 2019 मध्ये सातारा लोकसभा लढली आहे. त्यामध्ये त्यांना पराभवास सामोरे जावे लागले. आता बीचुकले यांनी पुन्हा 2024 च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

IMG 20240419 WA0039

नितीन पाटलांनी देखील भरला अर्ज?

नितीन पाटील हे माजी खासदार दिवंगत लक्ष्मणराव पाटील यांचे चिरंजीव व आमदार मकरंद पाटील यांचे बंधू आहेत. तसेच अजित पवार गटाचे नेते व जिल्हा बँकेचे अध्यक्ष असून त्यांनी आज जिल्हा निवडणुक अधिकारी जितेंद्र डूडी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. महायुती तर्फे पाटील यांनी उदयनराजे भोसले यांचा डमी अर्ज भरला असून त्यांच्यासोबत शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे, भाजप नेत्या चित्रलेखा कदम यांनी उपस्थिती लावली होती.