सातारा प्रतिनिधी । फक्त आमदारकीची आणि खासदारकीची नाही तर नगरसेवकापासून ते राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या साताऱ्याच्या अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) यांनी सातारा विधानसभा निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत राज्याचा मुख्यमंत्री मीच ठरवणार असे बेधडक वक्तव्य करणाऱ्या आणि सर्व निवडणुका लढून देखील एकदाही विजय न मिळवलेल्या बिचुकले यांनी काल पहिल्या अर्ज भरला यावेळी त्यांनी “भीड़ में सुअर आते हैं, शेर तो अकेला आता है” असाडायलॉग मार्ट सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
सातारा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी काल २२ ऑक्टोबर रोजी अभिजीत बिचुकलेने उमेदवारी अर्ज दाखल केला. साधारणपणे एखादा उमेदवार अर्ज भरण्यासाठी येतो तेव्हा त्याच्या सोबत मोठ्या संख्येने कार्यकर्ते असतात. अभिजीत बिचुकले मात्र एकटाच आला होता. त्याने उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आपल्या हटके स्टाइलमध्ये माध्यमांशी संवाद साधता म्हंटले की, भीड़ में सुअर आते हैं, शेर अकेला आता है.
नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असलेल्या अभिजीत बिचुकलेने निवडणूक लढवण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी अनेक विधानसभा आणि लोकसभेची देखील निवडणूक त्याने लढवली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातून बिचुकलेने उदयनराजे भोसले यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली होती. इतकच नाही तर विधानसभेत शिवेंद्रराजे भोसलेविरुद्ध त्याने निवडणूक लढवली आहे. मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध देखील बिचुकले मैदानात उतरला होता.
एका लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना बिचुकलेने अनामत रक्कम म्हणून १२ हजार ५०० रुपयांची चिल्लर जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा केली होती. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत साताऱ्यातून त्याला ७५९ मते मिळाली होती. तर २००९ साली विधानसभा निवडणुकीत ८९१ मते मिळाली होती. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत अभिजीत बिचुकलेला सर्वात कमी म्हणजे २ हजार ४१२ मते मिळाली होती. २०१४ साली ३ हजार ६४४ मते आणि २००९ साली १२ हजार ६६२ मते मिळाली होती.