सातारा प्रतिनिधी । राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप (Abhaysinh Jagtap) यांनी दहिवडी येथील शासकीय विश्रामगृहातील नुकतीच पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्यावर निशाणा साधला. “आडनाव गोरे आणि धंदे काळे असणाऱ्या आ. जमीनकुमार चोरेंना महिलांसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी क्रांतिकारी निर्णय घेणाऱ्या शरद पवार यांच्यावर बोलायची लायकी नाही, अशी टीका अभयसिंह जगताप यांनी केली.
याबेली जगताप म्हणाले की, प्रशासनाला वेठीस धरून लाडकी योजनेचा कार्यक्रम पार पडला आणि महिलांच्या कार्यक्रमात महिलांच्या दिशेने बंदुकीतून गोळ्या झाडलेल्या ऍक्शन केल्या. म्हसवड, दहिवडी वडूज येथील कार्यक्रमात शरद पवार यांच्यावर टीका टिप्पणी केल्या. परंतु, पवार साहेबांनी महिलांसाठी मालमत्तेत मुलाप्रमाणे मुलीलाही सामान हिस्सा देऊन मुलींना न्याय दिला आहे. पंचायतराजमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण दिल्यामुळे महाराष्ट्रात हजारो माता भगिनी सरपंच, नगराध्यक्ष, सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार, खासदार, मंत्री झाल्या. त्यामुळे माता भगिनींना सन्मान मिळू लागला.
सशस्त्र दलामध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळवून दिल्यामुळे महिला सैनिकी दलात काम करत आहेत. बारामतीमध्ये शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी महिला बचत गटांसाठी क्रांतिकारी योजना अंमलात आणल्या. भाजपसारखे महिलांना आळशी न बनवता स्वतःच्या पायावर उभा राहायला शरद पवार यांनी शिकविले.
वारंवार पक्ष बदलणाऱ्या जमीनचोर आणि मृताचे खाणाऱ्या जयकुमार गोरे यांची सूर्याप्रमाणे असणाऱ्या शरद पवार यांच्यावर बोलायची लायकी नाही. 2001साली विदर्भातील नेत्यांनी ओरड केली की आमच्यावर अन्याय होतोय त्यामुळे 2002 साली विदर्भातील अनुशेष पूर्ण होत नाही तो पर्यंत पश्चिम महाराष्ट्राला निधी मिळणार नाही हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे तिथून पुढे 10 वर्षे प्रकल्प रखडले गेले. 2006 मध्ये किरकसाल बोगद्याचे भूमिपूजन करण्याचे काम आर आर पाटील यांनी केले. त्यामुळे ही सर्व कामे मी केली असा फुकटचा आव आणण्याची गरज नाही. याचे संपूर्णश्रेय शरद पवार यांना जाते, असे जगताप यांनी म्हंटले.