माढ्याच्या अभयसिंह जगतापांनी घेतली शरद पवारांची भेट; कामरबंद केली ‘या’ विषयावर चर्चा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा निवडणुकीसाठी आज शरद पवार सातारा दौऱ्यावर आले होते. त्यांच्या उपस्थितीत शशिकांत शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, पवारांच्या आजच्या सातारा दौऱ्यावेळी अनेक महत्वाच्या घडामोडी देखील घडल्या. माढा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून तुतारी वाजविण्याच्या तयारीत असलेल्या अभयसिंह जगताप यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत चर्चा देखील केली. चर्चेअंती दोन दिवसांत निर्णय घेऊ, असे त्यांनी जगतापांनी सांगितले.

राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर याचे पडसाद माढा लोकसभा मतदारसंघातही उमटले असून या ठिकाणी देखील दोन गट पडले आहेत. पक्षाचे तीन आमदार सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार गटात असून बहुतांशी नेतेमंडळी देखील अजितदादांच्याबरोबर आहेत. त्यामुळे माढ्यात मोजक्याच शिलेदारांसह पक्षाचे अध्यक्ष शरद पवार निवडणुकीसाज रणनीती आखत आहेत. यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप यांचा देखील समावेश आहे. माढा लोकसभेसाठी आपल्यालाच उमेदवारी मिळणार म्हणून ते सहा महिन्यांपासून मतदारसंघात फिरत होते.

परंतु, शरद पवार यांनी धैर्यशील मोहिते-पाटील यांना पक्षात प्रवेश देऊन उमेदवारीही जाहीर केली. त्यामुळे नाराज झालेल्या अभयसिंह जगताप यांनी लोकसभा निवडणुकीत उतरण्याचा इशारा देखील दिला. जगताप यांनी बंडखोरी केल्यास राष्ट्रवादीच्या उमेदवारालाच फटका बसणार होता. हे ओळखून वरिष्ठांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, आज सकाळी पुण्यात शरद पवार यांची अभयसिंह जगताप यांनी भेट घेतली. यावेळी माढा मतदारसंघातील उमेदवारीवरून चर्चा झाली. तसेच मतदारसंघातील प्रश्न, ते सोडविण्यासाठी मला उमेदवारी मिळायला हवी, असे जगताप यांनी सांगितले. यावर पवार यांनी मी तुमच्याबरोबर आहे. कल्पना मांडा. लोकसभा निवडणुकीनंतर आपण भेटू, असे पवार यांनी जगताप यांना आश्वस्त केल्याची माहिती मिळत आहे. आता पवार यांच्या भेटीनंतर व चर्चेनंतर जगताप हे काय निर्णय घेणार यावर माढ्यातील राष्ट्रवादीचा तिढा सुटणार की वाढणार? हे स्पष्ट होणार आहे.