निवृत्ती वेतनधारकांनो आयकर सूट मिळण्यासाठी अगोदर करा ‘हे’ महत्वाचे काम!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत निवृत्ती वेतन घेणाऱ्या निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतन धारकांनी 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता मिळालेल्या उत्पन्नातून आयकर सूट मिळण्यासाठी महत्वाची कामे करणे गरजेची आहेत. त्यासाठी केलेल्या गुंतवणुकीचा तपशील लेखी अर्जासह 15 जानेवारी 2024 पर्यंत कोषागार कार्यालय, सातारा येथे सादर करावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी आरती नांगरे यांनी केले आहे.

याबाबत जिल्हा कोषागार कोषागार अधिकारी आरती नांगरे यांनी दिलेली माहिती अशी की, सादर केल्या तपशिलात बँकेचे नाव शाखा, पॅनकार्ड नंबर नमूद करणे आवश्यक आहे. तसेच निवृत्तीवेतन धारकानी जुना आयकर रिझीम व नवीन आयर रिझीम यापैकी योग्य असणारा पर्याय निवडून या कार्यालयास लेखी कळवावे.

जे निवृतीवेतन धारक आयकर रिझीमची निवड 15 जानेवारी 2024 पर्यंत लेखी या कार्यालयास कळवणार नाहीत. त्याची नवीन आयकर रिझीममध्ये जानेवारी 2024 व फेब्रुवारी, 2024 च्या निवृत्ती वेतनातून आयकर पात्र रक्कम वजावट करण्यात येईल. जुना आयकर रिझीम व नवीन आयकर रिझीम यापैकी योग्य पर्यायसाठी आपल्या नजीकच्या सनदी लेखापालची मदत घ्यावी. 15 जानेवारी 2024 नंतर कार्यालयात सादर करण्यात आलेल्या आयकर रिझीम पर्याय निवडीचा तसेच गुंतवणुकीचा विचार केला जाणार नाही.

ज्यांना नवीन आयकर रिझीमची निवड करावयची त्यांनी गुंतवणुकीचा कोणताही तपशील सादर करावयाची आवश्यकता नाही तसेच जुना आजयकर रिझीमची निवड करणा-या 60 वर्षावरील निवृती वेतनधारकाचे सर्व फरकासह वार्षिक उत्पन्न रुपये पाच लाख पन्नास हजाराच्या आत आहे अशा निवृतीवेतन धारकांनी गुंतवणूक तपशील सादर करण्याची आवश्यकता नाही.

आयकर वजावटीस पात्र असलेल्या सर्व निवृत्त वेतनधारकांनी आधार-पॅनकार्ड लिंक करावयाची कार्यवाही पूर्ण केलेली असावी. आयकर वजावटीस पात्र असलेल्या मात्र आधार-पॅन लिंक नसलेल्या निवृत्तीवेतनधारकांच्या निवृत्तीवेतनातून विहित दराने आयकर कपात करण्यात येईल, असे जिल्हा कोषागार अधिकारी यांनी म्हंटले आहे.