सातारा प्रतिनिधी | महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत लाभ देण्यासाठी जिल्ह्यातील 629 शेतकऱ्यांची यादी प्राप्त झाली आहे. तरी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण व मयत शेतकऱ्यांचे वारसांनी वारसनोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रीक यांनी केले आहे.
महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ प्रोत्साहनपर लाभ योजना २०२२ अंतर्गत रु. 50 हजार पर्यंत लाभासाठी सातारा जिल्हयातील ६२९ शेतकरी आधार प्रमाणीकरण करण्यासाठी शासणाकडून ३० ऑगस्ट २०२४ पर्यंत ६६७ शेतकऱ्यांची यादी प्राप्त झाली असुन प्रमाणीकरणासाठी ३ संप्टेबर २०२४ अखेर ६२९ शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण करणे व मयत शेतकऱ्यांच्या वारसांनी वारसनोंदी करणे आवश्यक आहे.
सातारा जिल्हयातील राष्ट्रीयकृत ,जिल्हा मध्यवर्ती , व्यापारी बँका यांच्याकडील ६२९ शेतकरी आधार प्रमाणीकरणापासून प्रलंबित आहेत. तसेच १३५ शेतकरी मयत आहेत त्यांची वारस नोंद करुन आधार प्रमाणीकरण झाल्याशिवाय सदरील शेतकरी अनुदानाच्या लाभास पात्र होणार नाहीत.सदर कर्जमुक्तीच पोर्टल शासनाकडून ७ संप्टेबर पर्यंत सुरु ठेवण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी त्यापूर्वी प्रमाणीकरण करुण घ्यावे, असेही श्री. सुद्रीक कळविले आहे.