सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील पाचगणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका युवकावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यास जखमी केल्याची घटना दि. ९ मे रोजी सायंकाळी ४ च्या सुमारास ही घटना घडली. याबाबत पाचगणी पोलिसांनी हल्लेखोर युवकावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पाचगणी पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, दि. ९ मे रोजी सायंकाळी ४ च्या सुमारास ही घटना घडली. प्रकाश आत्माराम खरात (वय ३७, रा. सिद्धार्थनगर, पाचगणी, ता. महाबळेश्वर) हे हॉटेल इल प्लाझा समोरील रोडवर उभे असताना ऋत्विक कदम (पूर्ण नाव माहीत नाही, रा. सिद्धार्थनगर पाचगणी), याने चाकूने त्यांच्यावर वार केले. यामध्ये ते जखमी झाले. यावेळी खरात यांचा मित्र सुयश कांबळे याने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला.
जखमी झालेल्या खरात यांना प्राथमिक आरोग्य केंद्र पाचगणी येथे उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर त्यांना वाई येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी संशयित आरोपी ऋत्विक कदम याच्यावर गुन्हा दाखल केला. तपास पाचगणीचे सपोनि दिलीप माने यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय आर. के. कदम करत आहेत.