वीज जोडणीसाठी ‘तो’ पोलवर चढला, अचानक कुणीतरी सुरु केला विजेचा प्रवाह; पुढं घडलं असं काही…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । वीज वितरण महामंडळाच्यावतीने ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या विहिरींची वीज जोडणी, पोळ उभारणी करण्याची कामे हाती घेतली जातात. या ठिकाणी महामंडळाच्या वायरमन तसेच इतर कर्मचाऱ्यांकडून हा कामे केली जातात. मात्र, वीज जोडणी करत असताना अनुचित घटनाही घडतात. अशीच घटना कराड तालुक्यातील खालकरवाडी येथे शनिवारी घडली. या ठिकाणी एका विहिरीची वीज जोडणी करण्यासाठी पोलवर चढलेल्या एका युवकाचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला.

ऋषिकेश प्रकाश कांबळे (वय 23 रा. केसे, ता. कराड) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील खालकरवाडी येथे एक शेतकऱ्याच्या शेतामधील विहिरीला वीज कनेक्शन जोडणीचे काम सुरु होते. शनिवारी वीज जोडणी करण्यासाठी ऋषिकेश कांबळे गेले होते. यावेळी ते पोल उभारून त्यावर तारा ओढत असताना कुणीतरी विजेचा प्रवास सुरु केला. या अचानक घडलेल्या प्रकारानंतर ऋषिकेश यांना जोराचा विजेचा धक्का बसला. विजेच्या धक्क्याने ते लांब फेकले गेले. यावेळी त्यांच्यासोबत असलेले अन्य चारजण देखील बाजूला फेकले गेले.

या घडलेल्या दुर्घटनेत ऋषिकेश कांबळे या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर जखमी झालेल्या चार जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात करण्यात आलेली नव्हती. दरम्यान, या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे.