वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या युवतीचा इमारतीवरून पडून मृत्यू; घटनेमुळे मलकापुरात खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील मलकापूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या युवतीचा मलकापूर येथील एका इमारतीवरून पडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे मलकापूर परिसरात खळबळ उडाली आह. आरोशी मिश्रा (वय २१) असे मृत युवतीने नाव आहे. या घटनेची कराड शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मलकापुरातील एका वैद्यकीय महाविद्यालयात आरोशी मिश्रा शिक्षण घेत होती. ती मलकापूरला वास्तव्यास होती. त्याच इमारतीवरून आरोशी रात्री अकराच्याच्या सुमारास पडल्याने गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात नेण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.

या घटनेबाबत शहर पोलिसांकडून गुप्तता पाळली होती. रात्री उशिरापर्यंत त्याचा तपास सुरू होता. दरम्यान, आणखी एक विद्यार्थी जखमी असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कराड शहर पोलिसांकडून रात्री आकस्मित मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली आहे.