च्या आयला…गद्दार कुणाला म्हणतो? तू तर बूट चाटत होतास…; विधानभवनात शंभूराज देसाईंकडून परबांना अरेरावीची भाषा

0
1725
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरू असून या अधिवेशनात सत्ताधारी व विरोधकरांच्यात खडाजंगी होत आहे. दरम्यान, आज राज्य विधानपरिषदेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि महायुतीचे पर्यटन तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. अनिल परब यांनी मराठी माणसांच्या मुद्यावरून बोलताना शंभूराज देसाई यांनी गद्दारी केली असा उल्लेख केलं. त्यावर गद्दार हा शंभूराज देसाई चांगलेच संतापले. त्यानंतर देसाईंनी च्या आयला तू गद्दार कोणाला बोलतो? बाहेर ये तुला दाखवतो, तू बूट चाटत होतास,” असा एकेरी उल्लेख करत अनिल परब यांच्यावर हल्लाबोल केला. त्यामुळे या दोघांच्या वादामध्ये विधान परिषदेचे काम दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.

उपमुख्यमंत्री एजकनाथ शिंदे पक्षातील महत्वाचे नेते व माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते उत्कृष्ट संसदपटू म्हणूनही गौरवण्यात आलेलेपाटण विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार, पर्यटनमंत्री अशी शंभूराज देसाई यांची ओळख. आज मंत्री शंभूराज देसाई हे त्यांच्या अरेरावीची भाषेमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले. ते म्हणजे महाराष्ट्र राज्य विधी मंडळाचे पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेच्या कामकाजावेळी मराठी माणसांच्या घरांवरून ही चर्चा सुरू होती आणि या चर्चेमध्ये अनिल परब, अंबादास दानवे, प्रसाद लाड, अनिल परब, राजेश राठोड, हेमंत पाटील आणि शंभूराज देसाई यांनी यांनी सहभाग घेतला होता. मराठी माणसांच्या मुद्द्यावरूनच चर्चा सुरू असतानाच परब आणि देसाई या दोघांच्यात वादाची ठिणगी पडली.

विधान परिषदेत कामकाज सुरू असताना गद्दार बोलल्यावरून संतप्त झालेले शिंदे शिवसेने नेते आणि उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई आणि ठाकरे शिवसेनेचे आमदार अनिल परब यांच्यात चांगलीच जुंपली. देसाई मंत्री असताना गद्दारी करत होते, अशा विधान आमदार परब यांनी केले. यावर संतप्त झालेल्या देसाई यांनी च्या आयला गद्दार कोणाला म्हणतोस, तू बाहेर ये, तुला दाखवतो, अशी धमकीच त्यांनी आमदार परब यांना दिली. ते पुढे म्हणाले की, ऐकून घ्यायला काय झोंबतंय का? तुमचे मराठीचे प्रेम पुतणा मावशीचे आहे. ‘तू बूट चाटत होतास’, असा हल्लाबोल देसाई यांनी परब यांच्यावर केला. त्यामुळे सभागृहामध्ये काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी परब यांनी उत्तर देण्यास सुरूवात केली. त्यामुळे गोंधळ वाढत गेला. त्यामुळे सभापतींना कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करावे लागले. त्यानंतर हे शब्द रेकॉर्डवरून हटवण्याच्या सूचना विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी दिल्या, त्यानंतर ते शब्द रेकॉर्डवरून काढून टाकण्यात आले. दरम्यान आमदार गायकवाड यांच्या मारहाणीच्या प्रकारामुळे शिंदे शिवसेनेच्या अडचणी वाढल्या असताना आता मंत्री देसाई यांच्या वादग्रस्त विधानामुळे अडचणीत आणखीच भर पडली आहे.