सातारा प्रतिनिधी | पर्यावरण हिताच्या दृष्टीने अनेक उपक्रम समाजात राबविले जातात. असाच एक उपक्रम सातारा येथे परब पडला आहे. ताऱ्यातील उडतारे गावातील बाळासाहेब पवार हायस्कूलच्या 1200 हून अधिक विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन किल्ले चंदन वंदन गडावर गोळा केलेल्या 12 लाख 78 हजारांच्या विविध प्रजातांच्या बियांचे गडावर रोपण केले. ‘एक पेड मां के नाम’ या उपक्रमांतर्गत हे रोपण करण्यात आले.
सातारा वन्यजीव सामाजिक वनीकरण विभाग आणि उडतारे गावातील बाळासाहेब पवार हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन वन महोत्सव 2024- 25 अंतर्गत ‘एक पेड मा के नाम’ हा उपक्रम किल्ले चंदन वंदन गडावर उपक्रम राबवला. या कार्यक्रमात उडतारे येथील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गोळा केलेल्या 12 लाख 78 हजाराच्या विविध प्रजातीच्या बियांचे रोपण करण्यात आले. यावेळी या उपक्रमात 1 हजार 200 सीडबॉल तयार करून याची लागवड देखील करण्यात आली. वड, पिंपळ अशा विविध प्रजातींचे 105 वृक्ष लावण्यात आले. उडतरे येथील शाळेतील 1200 विद्यार्थ्यांनी यावेळी सहभाग घेतला.
विद्यालयामध्ये अनेक उपक्रम राबवले जातात स्काऊट गाईड आणि हरित सेना अंतर्गत अनेक उपक्रम राबवले जातात. पर्यावरणाचा ऱ्हास होत चालल्यामुळे विद्यालयातील मुलांच्या मनात झाडे लावण्याची संकल्पना रुजवली. त्यामुळे 1 लाख 25 हजार बियांचे संकलन करून चंदन वंदन या किल्ल्यावर यांचे रोपण करण्यात आले. गेल्या 3 वर्षांपासून या शाळेमध्ये बीज संकलन हा उपक्रम राबवला जात आहे. शाळेमध्ये 1500 सीड बॉल मुलांनी तयार केले आहेत. एक पेड मां के नाम हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या उपक्रमामध्ये सातारच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला आहे.