Satara News : उडतारे- विरमाडे मार्गावरील सेवा रस्त्यावर ट्रक पलटी; चालक थोडक्यात बचावला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील उडतारे ते विरमाडे गावच्या दरम्यान आज बुधवारी सकाळी एक माल ट्रक पलटी होऊन अपघात झाल्याची दुर्घटना घडली आहे. सातारा बाजूच्या लेनवरून जात असताना अचानक माल ट्रक पलटी झाला असून यामध्ये ट्रकचे नुकसान झाले आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, वाई तालुक्यातील उडतारे ते वीरमाडे मार्गावरून आज सकाळी एक मालट्रक निघाला होता. तर्क जात असताना तो अचानक मार्गावरील सर्व्हिस रस्त्यावर पलटी झाला. हि अपघाताची घटना घडल्यानंतर या ठिकाणी काहीकाळ वाहतूक कोंडी निर्माण झाली. घटनास्थळी असलेल्या इतर नागरिकांनी ट्रक चालकास बाहेर काढले. तसेच या अपघाताची माहहती भुईंज पोलीसांना दिली.

या अपघाताची माहिती मिळताच भुईंज पोलीस ठाण्याचे एपीआय रमेश गर्जे यांच्या यांच्या सूचनेनुसार भुईंज पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात कोणीही जखमी झाले नसून ट्रकचे मात्र नुकसान झाले आहे. या अपघाताचे नेमके कारण समजू शकले नसून अपघाताचा अधिक तपास भुईंज पोलीस ठाण्याचे एपीआय रमेश गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली भुईंज पोलीस करत आहेत.