पुणे – सातारा मार्गावरील ‘या’ घाटात वाहनांच्या लांबच-लांब रांगा; नेमकं कारण काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा व पुणे जिल्ह्यांना जोडणारा महत्वाचा घाट असलेल्या पुणे-सातारा मार्गावरील खंबाटकी घाटात आज सकाळपासून वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे या घाट मार्गे जाणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीसह अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सकाळपासून घाट मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवसी सुट्टी असल्या कारणाने फिरायला जाण्यासाठी लोक मोठ्या संख्येने बाहेर पडले आहेत. त्यामुळे या घाट मार्गावरील रस्त्यावर वाहनांची सकाळपासून जास्तच संख्या वाढली आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन घाटातील वाहतूक संथ झाली आहे.

आज शनिवार आणि उद्या रविवार असल्या कारणाने सलग दोन दिवस सुट्ट्या आणि त्यापुढे स्वातंत्र्य दिन, पारशी दिन, अशा सलग सुट्ट्या असल्या कारणामुळे पुणेसह इतर ठिकाणचे पर्यटक सातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठी दाखल होऊ लागले आहेत. त्यामुळे पुणे-सातारा महामार्गावर वाहनांच्या संख्या इतर दिवसांपेक्षा आता जास्त वाढली आहे. पुणे – सातारा मार्गावरील खंबाटकी घाटात वाहतूक सकाळपासून संथ गतीने सुरू आहे. वाहनांचा वेग मंद असल्यामुळे घाटातून वर येण्यासाठी खूप वेळ लागत आहे. याठिकाणी पोलीस नसल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.

दरम्यान, पुणे – सातारा मार्गावरील खंबाटकी घाटाच्या सुरूवातीलाच आज सकाळी एक मालट्रक बंद पडला होता. त्यामुळे वाहनांची गर्दी होऊन वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. तासाभरानंतर मालट्रक रस्त्यातून बाजूला काढण्यात आला. तरीही वाहतुकीची कोंडी फुटलेली नाही. घाटातील दत्त मंंदिरापर्यंत वाहनांची गती संथ असून घाटाच्या पाचव्या वळणापर्यंत वाहनांची संख्या मोठी असल्याने त्याचा परिणाम वाहनांच्या गतीवर झाला आहे.

जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे सातारा जिल्ह्यातील प्रसिध्द पर्यटनस्थळांकडे जाणार्‍या मार्गांवर दरडी कोसळत होत्या. त्यामुळे प्रशासनाने महाबळेश्वर, कास, वाई, पाचगणी, कोयनानगर या भागातील पर्यटनस्थळी जाण्यास पर्यटकांना मनाई केली होती. त्याचा मोठा परिणाम पर्यटनावर झाला होता. आता पावसाने विश्रांती घेतली आहे. तसेच दरडींचा धोकाही टळला आहे. त्यामुळे पर्यटनस्थळे पुन्हा गजबजू लागली आहेत. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे फिरायला जाण्याचा प्लॅन करून लोक मोठ्या संख्येने बाहेर पडले आहेत.

Khambataki Ghat News 1

अजून 4 दिवस पुणे – सातारा मार्गावर वाहतुकीची गती राहणार संथ

पुणे- सातारा मार्गावर वाढलेली वाहनांची संख्या आणि निर्माण होत असलेली वाहतूक कोंडी पाहता पुढील चार दिवस या मार्गावर वाहतुकीची गती संथ राहणार आहे. सलग चार ते पाच दिवस असलेल्या सुट्ट्यांमुळे पुणे-सातारा मार्गावर ही परिस्थिती कायम राहणार आहे. त्यामुळे सातारा ते पुणे या प्रवासाला विलंब होणार आहे. खंबाटकी घाटात वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याने वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

मालट्रक बंद पडल्याने वाहतूक कोंडीला सुरूवात

पुणे- सातारा मार्गावरील खंबाटकी घाटाच्या सुरूवातीलाच आज शनिवारी सकाळी मालट्रक बंद पडला होता. त्यामुळे वाहनांची गर्दी होऊन वाहतुकीची कोंडी झाली होती. तासाभरानंतर मालट्रक रस्त्यातून बाजूला काढण्यात आला. तरीही वाहतुकीची कोंडी फुटली नाही. घाटातील दत्त मंंदिरापर्यंत वाहनांची गती संथ आहे. तसेच घाटाच्या पाचव्या वळणापर्यंत वाहनांची संख्या मोठी असल्याने त्याचा परिणाम वाहनांच्या गतीवर झाला आहे.