घोड्यावर बसला अन् अचानक घोडा उधळला, एकदम दरीत कोसळला; पुढं घडलं असं काही…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्रातील गजबजलेले पर्यटनस्थळ अशी महाबळेश्वरची ओळख आहे. या ठिकाणी येणारे पर्यटक हे येथील घोडेसवारीचा आनंद हे लुटतातच. घोड्यावर बसून निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटता यावा अशी प्रत्येक पर्यटकाची इच्छा असते. लॉडविक पाँईंट येथे काल सायंकाळी अशीच एक धक्कादायक घटना घडली. घोड्यावरुन सैर करताना पर्यटकासह घोडा दरीत कोसळला. मात्र, सुदैवाने घोडा ३० फुटावर अडकल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत घोडा आणि पर्यटक दोघेही जखमी झाले.

महाबळेश्वरातील लॉडवीक पाँईंटवर घोड्याची सैर मारण्यासाठी एक गृप आला होता. एका घोड्यावर पर्यटक सैर करण्यासाठी बसला आणि घोडा उधळला. त्याचा वेग अचानक वाढला आणि तो दरीच्या टोकावर गेला. त्यावेळी घोड्याचा पाय घसरला आणि घोडा दरीत कोसळला. घटना पाहणाऱ्यांच्या सर्वांच्या अंगावर शहारे आले.सुमारे दोन तासाच्या प्रयत्नानंतर पर्यटक आणि घोडा दोघांनाही सुखरुप बाहेर काढण्यात आले. दोघेही किरकोळ जखमी झाले आहेत.

2018 सालीही पर्यटकाच्या मृत्यूची घडली होती घटना…

महाबळेश्वर येथे 2018 साली एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याने घोड्यांवर बंदी घालण्यात आली आहे. पर्यटकांच्या सुरक्षितेचा प्रश्न डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आला होता. घोडे व्यावसायिकांवर आलेल्या या बंदामुळे स्थानिक नेते आक्रमक झाले होते. त्यानंतर घोडे सवारी सुरू करण्यात आली आहे.