घरच्यांना भेटण्यासाठी आला अन् सापळ्यात अडकला; दरोडा टोळीतील फरार आरोपीस अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी। कोयत्याचा धाक दाखवून दरोडा टाकून रक्कम लुटल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेतील फरारी आरोपीचा गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांकडून शोध घेतला जात होता. दरम्यान आज फरारी आरोपी घरच्यांना भेटण्यासाठी आला असताना पोलिसांना त्याला पकडण्यास यश आले आहे.

अदित्य बनसोडे (रा. वनवासवाडी, सातारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 14 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास एका महाविद्यालय परिसरात साहिल रणदिवे, पोपट भैया ऊर्फ अर्जुन, शुभम दानेश, अदित्य बनसोडे व इतर यांनी खंडणी मागणी करुन एकास कोयत्याचा धाक दाखवून दरोडा टाकुन त्याच्याकडील रोख रक्कम जबरदस्तीने घेण्याचा प्रकार केला होता. या घटनेनंतर संबंधित पीडित व्यक्तीने शाहूपुरी पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात फिर्याद दाखल केली होती.

त्यानंतर संबंधित आरोपीविरुध्द दरोडयाचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच पोलिसांकडून संबंधित फरार आरोपींचा शोध घेतला जात होता. यावेळी दरम्यान, पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधिक्षक बापु बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी यांनी यांनी शाहुपुरी पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांना फरारी असणाऱ्या आरोपीला अटक करणे बाबत सुचना दिलेल्या होत्या. तसेच पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी शाहुपूरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा.पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत बधे व गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार यांना नमुद आरोपी यांचा शोध घेवून अटक करणे बाबत मार्गदर्शन करुन सुचना दिलेल्या होत्या.

अशा प्रकारे केली अटक त्याप्रमाणे शाहुपूरी गुन्हे शाखेच्या विवीध पथकांनी त्याचा पुणे, कोडोली, वनवासवाडी येथे शोध घेतला होता असता आरोपी हा त्याचे वास्तव्य बदलुन राहत असल्याने तो मिळुन येत नव्हता. त्यानंतर फरारी आरोपीचा सातत्याने आढावा घेऊन शोध घेत असताना त्याला घरच्यांना भेटण्यासाठी आला असताना पोलिसांनी अटक केली.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक समीर शेख, अपर पोलीस अधिक्षक बापु बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा.पोलीस निरीक्षक प्रशांत बधे, पो.हेड.कॉ.सुरेश घोडके, पो.ना.मनोज मदने, निलेश काटकर, महेश बनकर, अभय साबळे, पो.कॉ. सचिन पवार, स्वप्निल सावंत, स्वप्निल पवार, सुमित मोरे यांनी केली आहे.

दि. 23 जुलै 2023 रोजी शाहुपुरी गुन्हे शाखेचे अंमलदार यांना माहिती मिळाली की, दरोडयातील फरारी आरोपी अदित्य बनसोडे रा. वनवासवाडी हा त्याचे राहते घरी वनवासवाडी सातारा येथे घरच्यांना भेटण्यासाठी येणार आहे. त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार व पथकाने अदित्य बनसोडे याच्या घराच्या परिसरात सापळा लावला. दुपारच्या सुमारास अदित्य बनसोडे हा त्याचे घराचे परिसरात येताच त्याला शाहुपुरी गुन्हे शाखेच्या अंमलदार व पथकातील अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. तसेच त्याच्यावर दरोड्यातील सहभागाप्रकारणी गुन्हा दाखल करत पुढील तपासकामी अटक केली आहे.