भीषण स्फोटात मिठाईचे दुकान जळून खाक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । आज मंगळवारी पहाटेच्या सुमारास नागठाणे येथे श्री गणेश राजपुरोहित स्वीटमार्ट या मिठाईच्या दुकानात झाला मोठा स्फोट झाला. या स्फोटाने परिसर हादरला. स्फोटात मिठाईच्या दुकानाला भीषण आग लागली.

याबाबत अधिक माहिती अशी की, नागठाणे येथे श्री गणेश राजपुरोहित स्वीटमार्ट हे मिठाईचे दुकान आहे. या दुकानास आज पहाटेच्या सुमारास अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटाच्या आवाजाने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. नागरीकांनी तातडीने दुकानाकडे धाव घेतली असता स्फोटामुळे दुकानास आग लागल्याचे त्यांनी पाहिले.

आगीमध्ये दुकानातील सर्व खाद्य पदार्थ तसेच इतर साहित्य जळून खाक झाले होते. याबाबतची माहिती नागरिकांनी अग्निशमन दलास दिल्यानंतर अग्निशामक बंबासह कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यातीळ कर्मचाऱ्यांनी दुकानावर पाण्याचा फवारा करीत आग आटोक्यात आणली. या आगीच्या घटनेत दुकानातील साहित्य जळून खाक झाले असून मोठी हानी झाली आहे.