सातारा जिल्ह्यात आढळला कोरोनाचा एक संशयित रुग्ण; डॉक्टरांनी केलं महत्वाचा आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । महाभयंकर अशा कोरोनामुळे अनेकांना जीव गमवावे लागले. या कोरोनामुळे सातारा जिल्ह्यात देखील हाहाकार मजला होता. दरम्यान, सातारा जिल्ह्यात तब्बल दोन वर्षानंतर कोरोनाचा एक संशयित रुग्ण परजिल्ह्यांतून दाखल झाला असून, त्या रुग्णावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सातारा जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपूर्वी काेरोनाने अनेक लोकांचा जीव घेतला. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. ही कोरोनाची लाट ओसरून जवळपास दोन वर्ष उलटून गेली परंतु आता राज्यात काही ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. चिपळूणमधील एक ५५ वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर त्या व्यक्तीला कराडमधील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्या व्यक्तीची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्या व्यक्तीला रुग्णालय प्रशासनाने पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.

गेल्या दोन दिवसांपासून संबंधित रुग्णावर अत्यंत चांगल्या प्रकारे उपचार झाल्याने त्या रुग्णाच्या प्रकृतीत चांगल्या प्रकारे सुधारणा झाली. दोन दिवसांत त्या रुग्णाला घरी सोडण्यात येणार आहे.

रुग्णाची प्रकृती उत्तम आहे : डॉ. किरण जाधव

सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या आढळलेल्या रुग्णावर उपचार करण्यात आले आहेत. संबंधित रुग्णावर कराड येथील कृष्ण रुग्णालयात उपचार सुरु होते. त्या ठिकाणाहून रुग्णास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत ‘हॅलो महाराष्ट्र’ ने जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधला. यावेळी जिल्हा रुग्णालयात संबंधित रुग्णावर उत्तम उपचार केल्यामुळे त्याची प्रकृती सुधारली आहे. त्यामुळे याबाबत कुणीही भीती बाळगू न्येव तसेच काळजी करण्यासारखे नसल्याची प्रतिक्रिया जिल्हा रुग्णालयातील डॉ. किरण जाधव यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.