सातारा प्रतिनिधी । सातारा शहरातील कैकाड गल्लीत सोमवारी एक अनोखी घटना घडली. या घटनेमुळं गल्लीतील बायका अचानक तापानं फणफणू लागल्या. तर रात्रीच्यावेळी स्वच्छास जाण्यासही भिऊ लागल्या आहेत. कारण हि तसं होत. अंधाऱ्या रात्री 11 वाजता साताऱ्यातील कैकाड गल्लीत सोमवारी कोपऱ्यावरचं असलेल्या सार्वजनिक शौचालयात दोन बायका शौचासाठी गेल्या आणि शौचालयातील ‘ती’चा पुतळा बघून त्यांच्या पोटातली कळ छातीत गेली. आणि त्या तापानं फणफणू लागल्या. ते भूत नव्हतं तर तो होता एका बाईचा पुतळा. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे
सातारा येथील कैकाड शौचालयात ठेवण्यात आलेला एक महिलेच्या पुतळ्याला साडी नेसवण्यात आली होती आणि तिच्या डोक्यावर पदरही होता. तसेच त्या पुतळ्याला मेक अप केलं होतं. त्यामुळे रात्रीच्या अंधारात तो पुतळा अधिक भयावह दिसत होता. कुणीतरी केलेल्या या अनोख्या फ्रँकची चांगलीच चर्चा सुरु आहे. त्या पुतळ्यास पाहताच बायकांच्या किंकाळ्यांनी आख्खी कैकाड गल्ली जागी झाली.
साताऱ्यात स्वच्छतागृहात अवतरलं भूत?; बघितल्यानंतर तापानं बायका लागल्या फणफणू pic.twitter.com/DOgloRFFXA
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 27, 2023
या अनोख्या भीतीदायक पुतळ्याला ठेवणाऱ्या कार्ट्यांनी पुतळ्याला असं काही सजवलं होत कि तो एखाद्या बाईप्रमाणेच दिसत होता. त्याला जो कोणी पाहिलं त्याला हार्ट अटॅक येणार हे नक्की. या पुतळ्यास त्याचा परिणाम इतका भयंकर झालाय की दोन तीन बायका तापानं फणफणतायत आणि बाकीच्या बायका आता त्या दिशेला फिरकतही नाहीत. चेष्टा आणि प्रँकच्या नादात अनेकांना घाम फुटला आहे. सार्वजनिक ठिकाणी तरी अशा प्रकारचे प्रँक करू नयेत, असे आवाहन सातारा पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे.