कराड प्रतिनिधी । पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कराड तालुक्यातील वराडे गावच्या हद्दीत भरधाव वेगात जाणारी कार सिमेंट दुभाजकाला धडकून अपघात झाला. साेमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास अपघाताची घटना घडली. अपघातात कारचे चाक निघून महामार्गावर पलटी झाली. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.
याबाबात अधिक माहिती अशी की, वराडे हद्दीत भराव पुलाचे काम सुरू आहे. त्याच दरम्यान सिमेंटचे दुभाजक ठेवून रस्ता एकेरी केला आहे. सोमवारी सकाळी कराडकडे कार क्रमांक (जीजे १५ सीपी ८२०६) निघाली होती.
भरधाव वेगात निघालेलया कारमधील चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यानंतर कार रस्त्यावरील सिमेंटच्या दुभाजकाला जाऊन जोरात धडकली. या भीषण अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.