सातारा प्रतिनिधी । सातारा रस्त्यावरील पुणे येथील सिटी प्रायीड समोरील भापकर पेट्रोल पंप देशमुख पेट्रोलियम पंपावर रविवारी दुपारच्या सुमारास सीएनजी भरलेल्या रिक्षाने अचानक पेट घेतला. यावेळी लागलेल्या आगीत रिक्षा पूर्णपणे जळून खाक झाली सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे येथील सातारा रोडवर गणेश बडदे (वय 52, रा. काकडे वस्ती) हे रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास रिक्षामध्ये सीएनजी गॅस भरण्यासाठी गेले होते. गॅस भरून झाल्यानंतर त्यांनी रिक्षा सुरु केले. त्यावेळी रिक्षा सुरु करताना रिक्षाच्या इंजिनने अचानक पेट घेतला. यावेळी त्या ठिकाणी असलेल्या पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी तात्काळ आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरु केले परंतु आग आटोक्यात येत नव्हती, कर्मचाऱ्यांनी अग्निशामक दलाला आगीबाबतमाहिती दिली. जनता फायर स्टेशनचा अग्निशामकी बंब घटनास्थळी दाखल झाला.
त्यातील फायरमन निलेश माने, महेश वळवी, प्रशांत कुंभार, निरंजन घोरपडे, मदतनीस सागर इंगळे, अजित लांडगे, ऋषिकेश बिबवे यांच्या पथकाने आग त्वरीत अटोक्यात आणली तोपर्यंत रिक्षा पूर्णपणे जळून खाक झाली होती. रिक्षाला आग लागण्याची घटना घडत असताना पंपावर अनेक वाहने इंधन भरण्यासाठी उभी होती सर्व वाहने त्वरीत पंपा बाहेर काढण्यात आली. सातारा रस्त्यावर बघ्यांची गर्दी झालयामुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.