कराड प्रतिनिधी । कराड नगरपालिकेच्या नगरवानालयाच्या वतीने नवरात्र उत्सवात दरवर्षी शारदीय व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. यावर्षी देखील कराड पलिकतेच्या वतीने शारदीय व्याख्यानमाला घेतली जात आहे. आज दि. ५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता प्रसिद्ध लेखक तथा उद्योजक प्रफुल्ल वानखेडे यांची बीबीसी मराठी दिल्लीचे मुक्त पत्रकार संपत मोरे हे प्रकट मुलाखत घेणार आहेत.
कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण ( टाऊन हॉल) येथे मुक्त पत्रकार संपत मोरे हे वानखेडे यांची मुलाखत घेणार आहेत. नगरपालिकेच्या नगरवानालयाच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या शारदीय व्याख्यानमालेस गुरूवारपासून प्रारंभ झाला आहे. कराड येथील ज्येष्ठ चित्रकार, शिल्पकार व व्याख्याते दादासाहेब सुतार यांनी पहिले पुष्प गुंफले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्याधिकारी सुविधा पाटील होत्या. माजी नगरसेवक सौरभ पाटील, बी. एस. खोत, ए. आर. पवार आदीं प्रमुख उपस्थिती होती.
नगरपालिका नगरवानालयाच्या माध्यमातून गेली 92 वर्षे सुरू असलेल्या शारदीय व्याख्यानमालेने लोकांच्यात कराड शहर व परिसरातील सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक प्रबोधन केले आहे. व्याख्यामालेसाठी विषय निवडताना शिक्षण, आरोग्य, प्रवास वर्णन, काव्य, आध्यात्म, विनोद, कथाकथन, साहित्य आदी सर्व क्षेत्रांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येतो.
दादासाहेब सुतार यांनी उत्तरालक्ष्मी देवाया मूर्ती शिल्पकला, रेखाचित्र याबाबत सविस्तर माहितीदिली. या व्याख्यानास कराडकर नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. ग्रंथपाल संजय शिंदे व सहकाऱयांनी संयोजन केले. प्रशांत लाड यांनी तयार केलेले मानपत्र सुतार यांना प्रदान करण्यात आले.