सासरच्या छळास कंटाळून प्राध्यापिकेने संपविली जीवनयात्रा; सहा जणांवर गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | माहेरहून दहा लाख रुपये आणण्यासाठी सतत होणार्‍या छळास कंटाळून पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी येथील प्रा. सौ. प्रियांका रणजित पाटील (वय 31) हिने राहत्या घरात फॅनला साडीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना मंगळवारी घडली. या प्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेले आरोपी कराड तालुक्यातील आहेत.

पती रणजित सुभाष पाटील, सासू सौ. शोभा सुभाष पाटील, सासरे सुभाष हिंदुराव पाटील, दीर इंद्रजित सुभाष पाटील, जाऊ सौ. प्रज्ञा इंद्रजित पाटील आणि नणंद सौ. शीतल चव्हाण (रा. कोळे, ता. कराड, जि. सातारा) यांच्यावर गुन्हा दखल करण्यात आला आहे. कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर रात्री उशिरा पती, सासू, दीर व जाऊ यांना अटक करण्यात आली आहे.

प्रियांकाचे वडील सुनील वसंतराव पवार (रा, कुंडल, ता. पलूस, जि. सांगली) यांनी फिर्याद दिली. कुंडल येथील प्रियांकाचा विवाह रणजित पाटील याच्याशी 2017 मध्ये झाला होता. प्रियांकाला माहेरहून खासगी साखर कारखाना खरेदीसाठी दहा लाख रुपये आणण्याची मागणी सुरू केल्यावर तिने पाच लाख रुपये आणले होते. परंतु, अजून पाच लाख रुपये घेऊन येण्यासाठी तिला शिवीगाळ, मारहाण करत छळ सुरू होता. याला कंटाळून तिने जीवनयात्रा संपविली. केली. अधिक तपास शाहूवाडीचे पोलिस उपाधिक्षक आप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक कैलास कोडग करत आहेत.